शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात क्षुल्लक कारणावरून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 23:32 IST

बहिणीकडून परत आलेल्या तरुणाची क्षुल्लक कारणावरून एका कुख्यात गुन्हेगाराने हत्या करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देवॉन्टेड गुन्हेगाराचे कृत्य : गळ्यात चाकू मारला : प्रतापनगरातील थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहिणीकडून परत आलेल्या तरुणाची क्षुल्लक कारणावरून एका कुख्यात गुन्हेगाराने हत्या करण्याचा प्रयत्न केला. गळ्यावर चाकू मारल्यामुळे शुभम अशोक मेश्राम (वय २५) हा तरुण गंभीर जखमी झाला. रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. अभय अजय हजारे असे आरोपीचे नाव आहे. तो पाचपावलीतील रहिवासी असून, तो कुख्यात गुन्हेगार आहे.शुभम अशोक मेश्राम हा सुभाषनगरातील कामगार कॉलनीत राहतो तर, त्याचा भाऊ तेजस अशोक मेश्राम (वय १७) हा महालमध्ये राहतो. हे दोघे रविवारी बहिणीकडे गेले होते. तिकडून परत आल्यानंतर ते शुभमच्या घरी जात होते. प्रतापनगरातील बिग बाजाराच्या मागे संत तुकडोजीनगर आहे. तेथून जाणाऱ्या गल्लीत काही जण बाकड्यावर बसून होते तर काही जण उभे होते. त्यामुळे रस्ता निमुळता झाला होता. गाडी काढण्यास अडचण होत असल्याने शुभमने त्यांना उद्देशून रस्ता सोडून उभे राहा असे म्हटले. एवढ्या एका क्षुल्लक कारणावरून आरोपी अभय हजारेने शिवीगाळ केली आणि जवळचा चाकू काढून शुभम मेश्रामच्या गळ्यावर मारला. ध्यानीमनी नसताना हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. शुभमला लगेच रुग्णालयात नेण्यात आले. माहिती कळताच प्रतापनगर पोलीस पोहचले. त्यांनी शुभमचा भाऊ तेजस याची तक्रार नोंदवून घेत आरोपी हजारेचा शोध सुरू केला.कुख्यात हजारेची डावबाजीआरोपी अभय हजारे हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसोबत संगनमत करून दोन महिन्यांपूर्वी यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची पाठलाग करून एका सावजी हॉटेलमध्ये भीषण हत्या केली होती. तेव्हापासून तो या गुन्ह्यात फरार होता. पोलिसांच्या लेखी वॉन्टेड असलेला हा खतरनाक गुन्हेगार एमआयडीसी, प्रतापनगरात बिनधास्त फिरून मजा मारत होता. त्याने अगदीच क्षुल्लक कारणावरून मेश्रामवर चाकूहल्ला चढवला. प्रतापनगर पोलीस मागे लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांसोबत डावबाजी केली. तेथील अटक आणि पीसीआर चुकविण्यासाठी सरळ यशोधरानगर पोलीस ठाण्यात जाऊन जुन्या हत्येच्या गुन्ह्यात अटक करवून घेतली. यावरून तो खतरनाकच नाही तर धूर्तही असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर