शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

दुचाकी वाहन चोरणाऱ्या अट्टल चोरांना अटक; ७७ लाख किमतीचे १११ दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2024 09:09 IST

विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात केली दुचाकीवाहन चोरी

नागपूर पोलिसांनी अश्या एका दुचाकी वाहन चोरट्याला अटक केली आहे, ज्याची कामगिरी बघून पोलीस कर्मचारीचं नाही तर अधिकारी  सुद्धा चक्रावले आहेत. या चोरट्याचे वय वर्ष अवघे २४ वर्ष मात्र त्याने दुचाकी चोरीच्या या क्षेत्रात भलतीच दूर पर्यत मजल मारली आहे. परंतु म्हणतात ना आरोपी कितीही शातीर असू द्या एक ना एक दिवस तो पकडला जातोचं. तसंच काहीसं या चोरट्याचे झाले आहे. ललित गजेंद्र भोगे असं या महा-चोरट्याचे नाव आहे. त्याने अवघ्या दोन वर्षात ७७ लाख ७० हजार रुपये किमतीच्या १११ दुचाकी चोरण्याचा विश्व विक्रमचं केला आहे. 

विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात केली दुचाकीवाहन चोरी-

आरोपीने नागपूर शहर ग्रामीण सह विदर्भातील अमरावती,चंद्रपूर,यवतमाळ,वर्धा,अकोला, भंडारा आणि गडचिरोली पोलिसांच्या नाकावर टिचून या पठ्याने तब्बल १११ दुचाकी चोरल्या आणि त्यांची परस्पर विक्री सुद्धा केली आहे. मात्र,एका दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असता तो नागपूर पोलिसांच्या हाती लागला आणि त्याचं बिंगचं फुटलं. नागपूर पोलिसांनी आतापर्यंत १११ दुचाकी जप्त केल्या असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

एकट्याने चोरल्या १११ दुचाकी-

वाहन चोरीच्या या कामात आरोपी ललित हा कुणाची मदत घेत नसे,त्याने एकट्याने एवढ्या साऱ्या गाड्या चोरल्या आहे अशी माहिती आता पर्यंतच्या तपासात पुढे आली आहे.

पोलिसांनी २५० कॅमे-यांची केली पाहणी-

वाहन चोर आरोपी ललित याने गेल्या महिन्यात वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दतील एक दुचाकी चोरली होती. दुचाकी मालकाने संदर्भात वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असल्याने वाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गंभीरपणे सुरू केला. पोलिसांनी ज्या भागातून तांत्रीक विश्लेषन करून एकूण २५० कॅमे-यांची पाहणी केली. 

फिल्मी स्टाईल आरोपीपर्यत पोहचले पोलीस-- 

गोपनीय माहीतीच्या आधारे तसेच वाहनचोरी तपास पथकाने नागपूर शहरातील वाहनचोरीचे हॉटस्पॉटची ओळख पटवली होती. त्या भागात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू केलं. सीसीटीव्ही कॅमे-यांची पाहणी करुन त्यामध्ये दिसत असलेल्या आरोपीचा हा वाडी मार्गाने अमरावतीच्या दिशेने जात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या मार्गावरील असलेल्या खाजगी कॅमेरांची पाहणी केली असता सदर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत असलेला इसम हा कोंढाळी भागातील असल्याचे गोपनीय माहीतीद्वारे निष्पन्न झाले. कोंढाळी येथे जावुन आरोपीचा शोध घेतला तो तिथं मिळुन आला. 

आरोपीच्या घरातून मिळाल्या २० दुचाकी-

वाहन चोर आरोपी ललितने वाडी पोलीस ठाणे हद्दीतुन चोरलेली ती दुचाकी गाडी आरोपीकडे मिळुन आली. पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्याच्या घराच्या परिसरातुन एकुण २० चोरीचे वाहने आढळून आले. वाडी पोलिसांनी आरोपी ललितला अटक केली. तपासादरम्याण एकुण ९१ चोरीचे वाहने जप्त केले. अशाप्रकारे एकुण १११ चोरीचे वाहने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ७७ लाख ७० हजार रुपये इतकी आहे. आरोपीने महाराष्ट्रातील एकूण ९ जिल्हात वाहनचोरी केल्याचं उघडकीस आले आहे. 

टॅग्स :Robberyचोरीnagpurनागपूर