पिंपरी : पूर्ववैमनस्यातून दोघांना बेदम मारहाण करत धारदार शस्त्राने वार केल्याची घटना निगडी येथे रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. दाद्या गवळी, छोट्या मगर, शाहरुख शेख, डॅन्या (सर्व रा. यमुनानगर, ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सागर बसुराज पवार (वय २७, रा. राजनगर, ओटास्किम, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर पवार व त्यांचे मित्र दुचाकीवरुन जात असताना आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांना अडविले. त्यानंतर दाद्या गवळी याने सागर यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. तर छोट्या मगर हा कोयत्यासारखे हत्यार घेवून सागर यांना मारण्यासाठी धावून आला असता सागर यांना वाचविण्यासाठी त्यांचा मित्र आला. त्यावेळी छोट्या मगर याने त्याच्याकडील हत्याराने सागर यांच्या मित्राच्या हातावर धारदार शस्त्राने वार केला. यामध्ये ते जखमी झाले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
निगडीत पूर्व वैमनस्यातून तरुणावर वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 16:11 IST