शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीसह तिच्या मुलावर चाकूहल्ला; प्रियकराला गोरेगावमध्ये अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 04:07 IST

फोन उचलला नाही, या रागात प्रियकराने प्रेयसीसह तिच्या पाच वर्षांच्या मुलावर चाकूने हल्ला केला.

मुंबई - फोन उचलला नाही, या रागात प्रियकराने प्रेयसीसह तिच्या पाच वर्षांच्या मुलावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत़ हल्लेखोराला अवघ्या काही तासांत वनराई पोलिसांनी अटक केली. देवेंद्र वाघेला असे हल्लेखोराचे नाव आहे. तो मीरा रोडच्या एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो.त्याचे सुनीता विनायक जाधव नामक विवाहितेशी प्रेमसंबंध जुळले होते. जाधवला पाच वर्षांचा मुलगा आहे़ चार वर्षांपूर्वी पतीसोबत पटत नसल्याने ती त्याच्यापासून वेगळी झाली. त्यानंतर, वाघेलासोबत तिची मैत्री झाली़ मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.जाधव सतत फोनवर बोलत असायची, ही बाब वाघेलाला खटकायची. त्याने कधीही फोन केला की, तिचा नंबर व्यस्त असायचा. त्याच्या मनात तिच्याविषयी संशय निर्माण झाला होता. शुक्रवारी जाधव गोरेगाव पूर्वच्या सोनावाला रोड परिसरातून तिच्या मुलाला घरी घेऊन निघाली होती.त्यावेळी वाघेला त्या ठिकाणी आला आणि त्यांच्यात फोनवरून वाद सुरू झाले. तेव्हा वाघेलाने सोबत आणलेल्या चाकूने जाधववर वार केले. घाबरलेल्या मुलाने आईला वाचविण्याचा प्रयत्न केला़, तेव्हा तोदेखील या हल्ल्यात जखमी झाला. दोघांनाही रक्ताच्या थारोळ्यात सोडून वाघेला फरार झाला. याबाबत वनराई पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले़ वाघेलाविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला. काही तासांतच त्यांनी वाघेलाला अटक केली. सुनीताच्या पाठीवर चार वार असून तिच्या मुलालादेखील दुखापत झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी