शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हाड ऑनलाइन मागवून कॉलेजमध्येच विद्यार्थ्यावर हल्ला; नेरुळमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 06:33 IST

दोन विद्यार्थ्यांतील किरकोळ वादातून प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : किरकोळ वादातून एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर कॉलेजमध्येच कुऱ्हाडीने वार केल्याची घटना गुरुवारी घडली. जखमी विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून थोडक्यात त्याचे प्राण वाचले. कॉलेजमध्ये झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी विद्यार्थ्याने बॅगमध्ये कुऱ्हाड आणली होती. हल्लेखोर विद्यार्थी अल्पवयीन आहे. त्याने ऑनलाइन कुऱ्हाड मागवली होती.  

नेरूळच्या एसआयईएस महाविद्यालयातील अकरावी वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या अकरावीच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता. या वादातून गुरुवारी एक जण बॅगमध्ये छोटी कुऱ्हाड घेऊन आला होता. दोघांमध्ये पुन्हा वाद होताच एकाने त्याच्याकडील कुऱ्हाडीने दुसऱ्याच्या पाठीवर तसेच शरीरावर वार केले. या घटनेनंतर एकच धावपळ उडाली. हल्लेखोर विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याचे थोडक्यात प्राण वाचले असल्याचे नेरूळ पोलिसांनी सांगितले.  हल्ला करणारा विद्यार्थी रागीट स्वभावाचा असल्याची चर्चा महाविद्यालयात आहे. याप्रकरणी शुक्रवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. 

वर्गात पसरवला चिली स्प्रेहल्ला करणाऱ्या मुलाने ऑनलाइन कुऱ्हाड मागवली होती. ती घेऊन तो कॉलेजला आला होता. गुरुवारी एका विषयाचे लेक्चर संपून दुसरे सुरू होत असताना वर्गात शिक्षिका नसताना त्याने संपूर्ण वर्गात चिली स्प्रे मारला. यामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यात जळजळ झाली. त्याचवेळी त्याने समोर आलेल्या विद्यार्थ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यावेळी इतर विद्यार्थी व शिक्षकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली.

घटनेनंतर जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. हल्ला करणारा विद्यार्थी ऑटिझमग्रस्त आहे. मानसिक संतुलन बिघडल्यानंतर त्याने हे कृत्य केले. त्याला शाळेतून काढण्यासाठी पालकांना कळवले आहे.- डॉ. कोयल रॉयचौधरी, प्राचार्या, एसआयईएस महाविद्यालय

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी