शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

आरबीआयच्या अधिकाऱ्यावर काचेच्या बाटलीने हल्ला; शेजाऱ्यावर बोरिवलीत गुन्हा दाखल

By गौरी टेंबकर | Updated: October 23, 2023 16:39 IST

बोरिवलीच्या गोराई परिसरात असलेल्या शक्तिधाम हाऊसिंग सोसायटीमध्ये कुटुंबीयांसोबत राहतात.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यावर काचेची बाटली फेकत त्यांना जखमी करण्याचा प्रकार बोरिवलीमध्ये शनिवारी घडला. त्या विरोधात या अधिकाऱ्याने बोरिवली पोलिसात धाव घेतल्यानंतर परमेश्वर लोहार (४०) नामक त्यांच्या शेजाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार अजित रहाटे (५६) हे रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या फोर्ट शाखेमध्ये काम करतात. तर बोरिवलीच्या गोराई परिसरात असलेल्या शक्तिधाम हाऊसिंग सोसायटीमध्ये कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ते २१ ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास मार्केटमधून फिरून आले आणि त्यांच्या घरासमोर दुचाकी पार्क करत होते. त्याच वेळी शेजारच्या खोलीत राहणाऱ्या लोहार यांनी त्याच्या टेरेसवरून रहाटेना शिवीगाळ करायला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर एका काचेच्या बाटलीत द्रवपदार्थ भरून ती बाटली रहाटेच्या दिशेने भिरकावली. ती बाटली त्यांच्या डोक्यावरून  मोटरसायकलच्या पुढच्या टायरकडे पडली आणि ती फुटून त्यातील द्रव पदार्थ तसेच काचेचे तुकडे रहाटे यांच्या पायावर तसेच चेहऱ्यावर उडाले. ज्यात रहाटेच्या पायाची पोटरी, उजवी भुवई आणि डाव्या बाजूच्या ओठाला जखम झाली. ते पाहिल्यावर रहाटेचा मित्र विठ्ठल टेनिस यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करत या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर रहाटे उपचारासाठी कांदिवली पश्चिमच्या शताब्दी रुग्णालयात गेले व तिथून त्यांनी बोरिवली पोलिसात धाव घेतली. लोहार आणि रहाटे यांच्यात काही वाद आहेत आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरूनच हा प्रकार करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी याप्रकरणी लोहारविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३२४, ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकCrime Newsगुन्हेगारी