शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बोरिवली, काळबादेवी, डोंगरीत पोलिसांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 05:29 IST

एकाची करंगळी फ्रॅक्चर, एकाला नेले फरफटत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या काही दिवसांत पोलिसांवरील हल्ले वाढत असताना मंगळवारी डोंगरी, काळबादेवी, बोरिवलीत पोलिसांवर हल्ल्याच्या घटनांची भर पडली आहे. यामध्ये एका घटनेत पोलिसांची करंगळी फ्रॅक्चर झाली आहे. तर दुसऱ्या घटनेत पोलिसाला दुचाकीचालकाने थेट फरफटत नेले आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे नोंदवत पोलिस अधिक तपास करत आहे. 

पोलिस शिपाई सत्यवान सोनावणे हे वाडीबंदर जंक्शन येथील फ्री वेच्या उताराजवळ नाकाबंदीदरम्यान संशयित वाहनांची तपासणी करत असताना, सुजल नरसिम फुली (१९) हा विनाहेल्मेट ट्रिपल सीट जाताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा इशारा केला. मात्र, त्याने न थांबता पोलिसांना धडक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान सोनावणे यांची करंगळी फ्रॅक्चर झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने सोनावणे याना जवळच्या रुग्णालयात नेले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. आणि आरोपीला राहत्या घरातून डोंगरी पोलिसांनी अटक केली आहे. 

त्यापाठोपाठ, काळबादेवी वाहतूक शाखेतील पोलिस हवालदार सुरेश श्रीरंग जाधव (५१) हे   यामलदास गांधी जंक्शन येथे कर्तव्य बजावत असताना, त्यांनी दुचाकी चालकाला थांबण्याचा इशारा दिला. मात्र त्याने दुचाकी न थांबवता सुसाट जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी, दुचाकी चालकाला पकडताच दुचाकी चालकाने त्यांनाच काही अंतरावर फरफटत नेले. यामध्ये ते जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एलटी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवत, अनाजे हरिशंकर वाल्मीकी (२४)  याला अटक केली आहे. तो कुलाबा येथील रहिवासी आहे. 

बोरिवलीत पोलिसांवर प्रहार बोरिवली पश्चिमच्या गणपत पाटीलनगर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद कार्यालयास प्रवीण तोगडिया हे भेट देणार असल्याने एमएसबी कॉलनी पोलिसांनी त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. वाहतुकीचे नियंत्रण करताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे आणि त्यांचे पथक हे कर्तव्यावर होते. त्याच दरम्यान मारहाण आणि अन्य गुन्ह्यातील पसार आरोपी चिराग हा त्या परिसरात येणार असल्याची माहिती शिंदे यांना मिळाली. त्यानुसार ते एटीसी पथकासह त्याच्या मागावर गेले. आरोपी गल्ली नंबर १३ मध्ये त्या फिरत असताना त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यावेळी त्याने शिंदे यांच्या हातावर जड वस्तूने प्रहार केला.

टॅग्स :Policeपोलिस