शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown : खाकीवर पुन्हा हल्ला! सामूहिक नमाज पठण करणाऱ्यांनी पोलिसांवर केला हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 21:07 IST

Lockdown : तेथे उपस्थित नमाज पठण करणाऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला.

ठळक मुद्देपोलिसांना या घटनेचा व्हिडिओ बनवायचा होता. तेव्हा काही लोकांनी  पोलिसांनी कुऱ्हाडीने व फावडीने हल्ला केला. एसपी प्रसाद यांनी सांगितले की दोन शिपायांची प्रकृती चिंताजनक आहे.कागजियाल मोहल्ला येथील साबिरच्या घराच्या छतावर  २५-३० नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते.

कन्नौज - उत्तर प्रदेशमधील कन्नौजमध्ये लॉकडाऊनदरम्यान शुक्रवारी घराच्या छतावर सामूहिक नमाज पठण करण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले आणि लोकांना सोशल डिस्टंसिंगबाबत सांगितले. तेव्हा तेथे उपस्थित नमाज पठण करणाऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये पोलीस चौकी प्रभारी, एलआययू शिपायासह चार पोलीस जखमी झाले. यानंतर पोलीस ठाण्यातून पोलीस बंदोबस्त पाठविला गेला आणि प्रकरण नियंत्रणात आणण्यात आले. 

 

दरम्यान, पोलिसांना मारहाण करणारे ते तेथून पळून गेले. पोलीस त्या सर्वांचा शोध ड्रोनच्या माध्यमातून घेत आहेत. कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने १४ एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाउन आहे. देशातील सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रं बंद आहेत. धार्मिक नेत्यांनी घरीच  नमाज अदा करण्याचे सांगितले होते. गुरूवारी मुस्लिम धर्मगुरूंनीही शुक्रवारचा नमाज घरात वाचल्या पाहिजेत, असे आवाहन केले. काही लोकांनीही याची अंमलबजावणी केली. परंतु, सदर कोतवाली परिसरातील कागजियाल मोहल्ला येथील साबिरच्या घराच्या छतावर  २५-३० नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते. ही माहिती मिळताच हाजी शरीफ चौकीचे प्रभारी आनंद पांडे, एलआययूचे हवालदार राजवीर सिंह फोर्ससह घटनास्थळी दाखल झाले.जेव्हा पोलिसांनी नमाजनंतर छतावरुन खाली उठणाऱ्या सोशल डिस्टंसिंगचे व लॉकडाऊन पाळण्यास  सांगितले. तेव्हा त्या लोकांमध्ये आणि पोलिसांच्यात वाद सुरू झाला. पोलिसांना या घटनेचा व्हिडिओ बनवायचा होता. तेव्हा काही लोकांनी  पोलिसांनी कुऱ्हाडीने व फावडीने हल्ला केला. चौकी प्रभारी आनंद पांडे यांच्यासह चार पोलीस जखमी झाले आहेत. सर्वांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. एसपी प्रसाद यांनी सांगितले की दोन शिपायांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर आणखी काही लोक फरार झाले आहेत.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश