नालासोपारा - पूर्वेकडील परिसरात दीड कोटीचे कोकेन विकायला आलेल्या नायजेरियनला दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी दुपारी पकडल्याची घटना घडली आहे. एक नायजेरियनला पोलिसांनी पकडले असून दुसरा पळाला असून फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ शहरात मिळाल्याने सर्वत्र खळबळ माजली असून ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर परिसरात दोन नायजेरियन कोकेन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार सुनील देशमुख, चंद्रकांत ढाणे, प्रकाश कदम, सचिन पाटील, अनिल चव्हाण, दिनेश गायकवाड, तुषार माळी, जगदीश गोवारी, महेश पागधरे, शुभम ठाकूर, मनोज लोहार, किशोर धनु, सुभाष आव्हाड, नवनाथ तारडे, दीपक पाटील या टीमने पहाटेपासून प्रगती नगर परिसरात दोन टीम बनवून सापळा रचला होता. दुपारच्या सुमारास दोन नायजेरियन संशयास्पद फिरताना पोलिसांना दिसल्यावर पोलीस त्याठिकाणी पोहचताच एक नायजेरियन आरोपी पळाला पण त्याचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केला असून एकाला दीड कोटीचे 1496 ग्रॅम कोकेनसह ताब्यात घेतले आहे. डेयेटा जेरोम (30) असे पकडलेल्या नायजेरियन आरोपीचे नाव आहे. तुळींज पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात एनडीपीएस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव हे तपास करत आहे.
एटीएसची धडक कारवाई; नालासोपाऱ्यातून दीड कोटीचे कोकेन हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 18:57 IST
ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
एटीएसची धडक कारवाई; नालासोपाऱ्यातून दीड कोटीचे कोकेन हस्तगत
ठळक मुद्देएक नायजेरियनला पोलिसांनी पकडले असून दुसरा पळाला असून फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. एकाला दीड कोटीचे 1496 ग्रॅम कोकेनसह ताब्यात घेतले आहे.