शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एमडी तस्करीप्रकरणी एटीएसने घेतला पठाणचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 07:58 IST

MD smuggling case : एमडी तस्करी प्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दक्षिण मुंबईत पाब्लो एस्कोबार (कोलंबियातील ड्रग माफिया) या नावाने ओळख असलेल्या परवेज नसरुल्ला खान ऊर्फ चिंकू पठाण (वय ४०) याला अटक केली.

मुंबई : एमडी तस्करी प्रकरणात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दक्षिण मुंबईत पाब्लो एस्कोबार (कोलंबियातील ड्रग माफिया) या नावाने ओळख असलेल्या परवेज नसरुल्ला खान ऊर्फ चिंकू पठाण (वय ४०) याला अटक केली.एटीएसने एमडी तस्करी प्रकरणात दाखल गुन्ह्यात सोहेल सागीरअली सैय्यद (वय ३४) आणि झिशान आरिफ मेमन (३२) यांना अटक केली होती. याच गुन्ह्यात पठाण हा आरोपी होता. एनसीबीने डोंगरीतील एमडी कारखाना उद्ध्वस्त करत पठाणला घणसोली येथून अटक केली. संघटित गुन्हेगारी टोळीच्या मदतीने त्यांचा हा अवैध धंदा अनेक वर्षे सुरू होता. तो दाऊदचा नातेवाईक असून करीम लाला याच्याशीही त्याचे नातेसंबंध आहेत. एमडी विक्रीसाठी त्याने दक्षिण मुंबईतील विशेषत: डोंगरी, नागपाडा, जेजे मार्ग परिसरात वास्तव्य करणाऱ्या, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आणि दाऊद किंवा करीम लाला यांच्याशी संबंधित व्यक्तींना आपल्या टोळीत सहभागी करून घेतल्याची माहितीही एनसीबीच्या हाती लागली आहे.दुसरीकडे समोर आलेल्या माहितीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक मुंबईतील ड्रग्ज विक्रीतून दहशतवादासाठी हवालामार्गे फंडिंग करत असल्याची धक्कादायक माहिती एनसीबीच्या चौकशीत समोर आली आहे. गेल्या ५ वर्षांत हस्तकांनी तब्बल १५०० कोटींचे ड्रग्ज विकले आहेत. त्यात, पठाणच्या डायरीतूनही अनेक सेलिब्रिटी, उद्योजक मंडळींची नावे एनसीबीच्या हाती लागली. दरम्यान, पठाण याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याने त्याला ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान, चिंकू पठाणची प्रकृती खालावल्याने त्याला ३० तारखेला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. तेथे उपचाराअंती त्याला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

१० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीएटीएसने ३० जानेवारी रोजी न्यायालयाच्या आदेशाने पठाणचा ताबा घेत, त्याच्याकडे चौकशी केली. एटीएसच्या दाखल गुन्ह्यांत सहभाग स्पष्ट होताच त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडे एटीएसचे पथक अधिक तपास करत आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थMumbaiमुंबई