शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 06:55 IST

साकिब नाचणच्या घरावरही छापे; तलवार, सुरे जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/ठाणे : देशाच्या विरोधात कट कारस्थान करून घातपात करण्याची तयारी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ठाणे ग्रामीण पोलिसांसोबत ठाणे जिल्ह्यातील पडघा व बोरिवली गावात मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली. या कारवाईत पडघा येथील १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. कुख्यात साकिब नाचण आणि सीमी या बंदी असलेल्या संघटनेच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या घरावर ही छापेमारी करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, एक जूनच्या पहाटेपासून दोन जूनच्या मध्यान्हापर्यंत पडघा आणि बोरिवली गावांतील ४७ठिकाणी झालेल्या या कारवाईत एटीएसच्या २० पथकांसह ४०० पोलिस सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पोलिसांच्या ताफ्याने पडघा व बोरीवली गावाला भल्या पहाटेपासूनच घेरल्यामुळे परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. यादरम्यान कोणीही बाहेर जाऊ नये, तसेच त्याची कुणकुण लागून येथील सामग्री कुठेही बाहेर नेली जाऊ नये, यासाठी ही मोहीम अत्यंत गोपनीयरीत्या राबविल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याची शक्यता गृहीत धरून मोठा सशस्त्र फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यामध्ये २५ ते ३० महिला कर्मचाऱ्यांचीही मदत घेण्यात आली. ऑपरेशनदरम्यान, बोरीवली गावाकडे येणारे आणि जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते.

पडघा दहशतवादाचा अड्डा?

२००३ मध्ये मुलुंड, घाटकोपर रेल्वे स्थानकात झालेल्या बॉम्बस्फोटामुळे पहिल्यांदा हे गाव प्रकाशझोतात आले. या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड म्हणून साकिब नाचण आणि त्याच्या साथीदारांना अटक केली होती. मुलुंड बॉम्बस्फोटप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून साकिब याला दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणाची शिक्षा भोगल्यानंतर साकिबची सुटकाही झाली. सध्या तो राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहे.

पडघा स्वतंत्र गाव घोषित केले!

धक्कादायक गोष्ट म्हणजे, साकिब नाचण व त्याच्या साथीदारांनी पडघा गावाला स्वतंत्र गाव किंवा मुक्त विभाग असे घोषित केले होते, तसेच अनेक मुस्लीम तरुणांना पडघा येथे राहायला आणण्यासाठी ते प्रयत्नशील होते. पडघा हा त्यांचा तळ होता व तो त्यांना अधिक भक्कम करायचा होता.

साकिब नाचणच्या घरावरही छापे

मुलुंड आणि घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपी साकिब नाचण याच्या घरासह अनेक संशयित घरांमध्ये यावेळी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही ९ डिसेंबर २०२३ रोजी बोरीवली गावात अशाच प्रकारे छापा टाकला होता. त्यावेळी देशविरोधी कारवायांमध्ये सक्रिय असल्याच्या कारणावरून साकिबसह बोरीवलीचे उपसरपंच फरहान सुसे यांच्यासह १५ जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतले होते. सध्या हे सर्व आरोपी अटकेत आहेत.

कुणाकुणावर छापे

पोलिसांनी साकिब नाचण याच्यासह अकिब साकिब नाचण, अब्दुल लतिफ कासकर, कैफ नाचण, सजील नाचण, फराक झुबीर मुल्ला यांच्या घरावर देखील छापेमारी केली. यावेळी सहाही जण घरात सापडले नाहीत.

तलवार, सुरे जप्त

गावातील काही तरुण दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचा संशय स्थानिक पोलिसांसह दहशतवादी विरोधी पथकाला आहे. त्यामुळेच हे तरुण तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. काही संशयितांच्या घरांमधून लॅपटॉप, मोबाइल, तलवार, सुरे असे साहित्यही पोलिसांनी जप्त केले.

टॅग्स :Anti Terrorist Squadएटीएसthaneठाणेborivali-acबोरिवली