शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटांच्या तस्करी प्रकरणातील म्होरक्या एटीएसच्या जाळयात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 22:09 IST

Bogus note smuggling case: एटीएसने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात देखील रेहमानचा पाहिजे आरोपी म्हणून उल्लेख होता. 

ठळक मुद्देअताऊर अयुब अली रेहमान (२८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नाव आहे.

मुंबई : बनावट नोटांच्या तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपीला ७ वर्षाने अटक केली आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये त्याला बेडया ठोकल्या आहेत. यात, अताऊर अयुब अली रेहमान (२८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नाव आहे.  

एटीएसने बनावट नोटांंप्रकरणी १२ एप्रिल २०१४ रोजी ७ आरोपीना अटक करत त्यांच्याकड़ून ५ लाख १७ हजार बनावट नोटा जप्त केल्या होत्या. अटक आरोपींविरोधात दोषारोप पत्र देखील दाखल करण्यात आले आहे. यातच रेहमान हा मुख्य आरोपी असल्याचे तपासात समोर आले. एटीएसने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात देखील रेहमानचा पाहिजे आरोपी म्हणून उल्लेख होता. 

             

गेल्या सात वर्षापासून पथक त्याचा शोध घेत होते. अनेकदा पथक आरोपीच्या शोधासाठी पश्चिम बंगालमध्ये जावून आले. मात्र रेहमान त्यांच्या हाती लागला नाही. अखेर पुन्हा त्याचे पश्चिम बंगाल मधील लोकेशन समजताच पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याने बांग्लादेश मधून बनावट नोटा मिळवल्या होत्या. याच नोटा अटक आरोपीकड़े बाजारात वितरीत करण्यासाठी दिल्या असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी रेहमान कड़े अधिक तपास सुरु आहे. 

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसMumbaiमुंबईArrestअटक