शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कार्ड अडकले; बाहेर काढण्यासाठी तरुणाने मशीन तोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 07:12 IST

कांदिवली पूर्वच्या सेंट्रीअम मॉलमध्ये एक इसम अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम फोडत आहे, असा मेसेज पोलीस नियंत्रण कक्षाकडून समतानगर पोलिसांना मिळाला.

मुंबई : पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनमध्ये स्वाइप केलेले कार्ड अडकले, ते काढण्याचा बराच वेळ प्रयत्न करूनही न निघाल्याने एका तरुणाने मशीनचीच तोडफोड केल्याचा प्रकार कांदिवलीत घडला. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.

कांदिवली पूर्वच्या सेंट्रीअम मॉलमध्ये एक इसम अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम फोडत आहे, असा मेसेज पोलीस नियंत्रण कक्षाकडून समतानगर पोलिसांना मिळाला. त्यानुसार समतानगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सुळे हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले.तेव्हा तेथे त्यांना अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएममधील मशीन डिस्प्ले स्क्रीन उचकटून व वायरिंग व इलेक्ट्रिक साधनाचे नुकसान करून चोरीचा प्रयत्न झाल्याचे आढळले.

मात्र आजूबाजूला कोणी संशयित व्यक्ती दिसली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा फोन करणाऱ्याला संपर्क साधून आरोपीविषयी व त्याने वापरलेल्या मोटारसायकल संदर्भात वर्णन विचारले. तेव्हा तो क्रांतीनगर रिक्षा स्टॅण्डजवळ स्कूटी पार्क करून झोपडपट्टीत पळून गेल्याचे त्यांना समजले. त्यानुसार पोलिसांनी शिताफीने त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत संजय बलीहरिप्रसाद कुमार (२६) असे आरोपीचे नाव असून तो मार्वे रोड परिसरात राहत असल्याचे पोलिसांना समजले. त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली असून त्याच्यावर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक राजू कसबे यांनी सांगितले.