शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रहस्य... ICU मध्ये आईस्क्रीम खाल्ले आणि एअरहॉस्टेसचा मृत्यू झाला; नंतर मावसभावाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 13:33 IST

Crime News: रोझीच्या मृत्यूच्या २४ तासांच्या आत सॅम्युअल संगमाचाही संशयास्पद मृत्यू झाला. त्याचा मृतदेह दिल्लीतील एका हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दोघांच्याही मृत्यूनंतर पूर्वोत्तर राज्यांच्या नागरिकांनी सोशल मीडियावर असंतोष जाहीर केला आहे.

गुरुग्रामच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका एअर हॉस्टेसचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आयसीयूमध्ये आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तिचा मृत्यू झाला, यानंतर तिच्या मावसभावाचा मृतदेह गळफास घेतलेला आढळल्याने या रहस्यमयी मृत्यूमुळे मोठा वादंग सुरु झाला आहे. रोझी संगमा ही नागालँडच्या दीमापूरची राहणारी होती. ती एअर हॉस्टेस होती. हे प्रकरण सॅम्युअल संगमाने सोशल मीडियावर व्हायरल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सॅम्युअल संगमाही तिची मावशी होती. (airhostess died after ate ice cream in ICU.)

रोझीच्या मृत्यूच्या २४ तासांच्या आत सॅम्युअल संगमाचाही संशयास्पद मृत्यू झाला. त्याचा मृतदेह दिल्लीतील एका हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दोघांच्याही मृत्यूनंतर पूर्वोत्तर राज्यांच्या नागरिकांनी सोशल मीडियावर असंतोष जाहीर केला आहे.

हे दोघे दिल्लीच्या बृजवासन भागात भाड्याने राहत होते. घटना २३ जूनच्या रात्रीची होती. रात्री अचानक रोझीच्या हाता, पायात खूप वेदना होऊ लागल्या. तसेच प्रायव्हेट पार्ट मधून रक्तस्त्राव होऊ लागला. यामुळे मावस भावाने तिला दिल्लीच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जिथे तिची प्रकृती बिघडली आणि तिला २४ जूनच्या सकाळी ६ वाजता, गुरुग्रामच्या अल्फा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 

मावस भावाने हॉस्पिटमधून बनविलेल्या व्हिडीओमध्ये, रोझीची तब्येत सुधारली होती. आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या उपस्थितीत तिला आईस्क्रीम देण्यात आले. यानंतर तिची तब्येत बिघडली व तिचा मृत्यू झाला. यावर आम्ही जेव्हा व्हिडीओ बनविण्यास सुरुवात केली तेव्हा डॉक्टरांनी तिला मारहाण केली, असे सांगितले आहे. मेघालयच्या खासदाराने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी