शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी कल्याणमधून केली अटक; तीन रिव्हॉल्व्हर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 00:22 IST

टिटवाळा येथे राहणाºया लोहारियाला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक देशी कट्टा आणि सात जिवंत काडतुसे सापडली.

कल्याण : बाजारपेठ पोलिसांनी दोन अट्टल गुन्हेगारांना गुरुवारी मध्यरात्री अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन रिव्हॉल्वर, ११ जिवंत काडतुसे, एक तलवार, दोन सुरे आणि दुचाकी असा एक लाख ४१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सुरेश तेवर आणि प्रवीण लोहारिया अशी त्यांची नावे आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात एक व्यक्ती रिव्हॉल्व्हरसह दुचाकीवर फिरत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नितीन भोसले यांना मिळाली. त्यावरून घटनास्थळी पोलिसांचे पथक रवाना झाले आणि त्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याचे नाव सुरेश ऊ र्फ सुºया अयाकुट्टी तेवर असल्याचे उघड झाले. त्याच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे सापडली. त्याची अधिक चौकशी करता त्याच्याविरोधात तामिळनाडू राज्यात आणि मुंबईतील भांडुप पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. तसेच त्याने त्याचा साथीदार प्रवीण लोहारिया नावाच्या साथीदाराकडे आणखीन रिव्हॉल्व्हर ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. टिटवाळा येथे राहणाºया लोहारियाला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक देशी कट्टा आणि सात जिवंत काडतुसे सापडली.

टिटवाळा परिसरातच बनेली वस्तीवर सुरेश तेवर हा आश्रयाला येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून संबंधित ठिकाणाची तपासणी केली असता त्याठिकाणी एक तलवार आणि दोन सुरे आढळले. या दोघांना अटक करून शुक्रवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.दरम्यान, या दोघांनी शस्त्रसाठा का बाळगला होता, मोठा घातपात करण्याचा त्यांचा प्रयत्न होता का? याबाबतचा सखोल तपास केला जाईल, अशी माहिती कल्याण पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Policeपोलिस