शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

Mass Shooting in Thailand: थायलंड गोळीबार: हल्लेखोर माजी पोलिसाची आत्महत्या; पत्नी आणि मुलीलाही संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 13:49 IST

नॉन्ग बुआ लम्फू प्रांतातील लहान मुलांना सांभाळणाऱ्या डे-केअर सेंटरवर  हा गोळीबार करण्यात आला.

थायलंडच्या एका चाईल्ड सेंटरमध्ये भीषण घटना घडली आहे. लहान मुलांच्या या केंद्रात प्रचंड गोळीबार झाला असून यामध्ये कमीतकमी 31 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. देशाच्या ईशान्येकडील प्रांतात हा गोळीबार झाल्याचे पोलिस प्रवक्त्याने सांगितले आहे. हल्लेखोर माजी पोलिसाने आत्महत्या केली असून त्याने त्यापूर्वी पत्नी आणि मुलीलाही ठार केले आहे. 

गुरुवारी देशातील नॉन्ग बुआ लम्फू प्रांतातील लहान मुलांना सांभाळणाऱ्या डे-केअर सेंटरवर  हा गोळीबार करण्यात आला. हल्लेखोर बँकॉकची लायसन्स प्लेट असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिकअप व्हॅनमधून पळून गेला. कारचा नंबर 6499 सांगितला जात आहे. या क्रमांकाचे पिकअप वाहन कोणी पाहिले असल्यास 192 वर फोन करून माहिती द्यावी, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.

रॉयटर्सनुसार हल्लेखोर हा माजी पोलीस अधिकारी आहे. थायलंडच्या पंतप्रधानांनी सर्व यंत्रणांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. थायलंडमध्ये इतर देशांच्या तुलनेत परवानाधारक बंदुक धारकांची संख्या जास्त आहे. यापूर्वी 2020 मध्येही असाच गोळीबार झाला होता. यामध्ये मालमत्तेच्या व्यवहारातून संतापलेल्या सैनिकाने 29 लोकांना गोळ्या घालून ठार केले होते. तर 57 लोक जखमी झाले होते.

टॅग्स :Thailandथायलंड