शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"...नाहीतर तुम्हाला भस्म करेन"; कुंडली दाखवण्यासाठी आलेल्या युवकांचा लैंगिक छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 08:37 IST

अटक केलेल्या आरोपी युवकांचा पोलिसांनी जबाब घेतला त्यात धक्कादायक खुलासा झाला

कानपूर – ज्योतिषाजवळ समस्येचं निवारण करण्यासाठी आलेल्या २ मुलांनी केलेल्या चोरी प्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. चोरी केलेले पैसे इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या युवकांना पोलिसांनी पकडले. त्या युवकांच्या जबाबावरून आता पोलिसांनी ज्योतिषालाही अटक केली आहे. कानपूरच्या गोविंद नगर भागात एका घरात चोरी झाली होती. घराचे मालक व्यवसायाने ज्योतिषी होते.

ज्योतिष तरुण शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं की, २ मुले त्यांच्या गर्लफ्रेंडला कसं मनवायचे? या समस्येचं निवारण करण्यासाठी आले होते. त्यांनी नशेचे कोल्डड्रिंक मला देऊन घरात चोरी करून फरार झाले. पोलिसांनी जेव्हा या युवकांचा शोध सुरू केला तेव्हा त्यांच्या सोशल मीडिया इन्स्टाग्राम खात्यावर हॉटेलच्या रुममधील बेडवर नोटांचे बंडल असल्याचा व्हिडिओ दिसला. त्यानंतर पोलिसांनी सर्व्हिलान्सच्या माध्यमातून या दोन्ही अल्पवयीन युवकांना अटक केली.

अटक केलेल्या आरोपी युवकांचा पोलिसांनी जबाब घेतला त्यात धक्कादायक खुलासा झाला. ज्या ज्योतिषाच्या घरी चोरी झाली, ती का करण्यात आली हे युवकांनी पोलिसांना सांगितले. आरोपी युवक पोलिसांना म्हणाले की, जेव्हा आम्ही ज्योतिषाकडे समस्येचं निवारण करण्यासाठी गेलो तेव्हा ज्योतिषी तरुण शर्मा यांनी १ रात्र आमच्यासोबत जबरदस्तीने समलैंगिक संबंध बनवले. जेव्हा आम्ही विरोध केला तेव्हा तुम्हाला भस्म करू अशी धमकी दिली. त्याचसोबत तुमची समस्या दूर करू असंही ज्योतिषाने सांगितले त्यामुळे युवकांना जास्त विरोधही केला नाही.

दोन्ही मुलांवर अत्याचार करून जेव्हा तरुण शर्मा झोपी गेला तेव्हा युवकांनी बदला घेण्यासाठी त्याच्या घरात असलेली तिजोरी तोडून चोरी करत पैसे घेऊन फरार झाले. जेव्हा सकाळी तरुण शर्मा उठला तेव्हा युवक पैसे घेऊन फरार झाल्याचे पाहिले आणि त्याने बनावट कहाणी सांगून त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार दिली. सध्या पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून युवकांच्या तक्रारीवरून आरोपी तरूण शर्मालाही अटक करण्यात आली आहे. तरुण शर्मा याच्यावर कलम ३७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी