शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सहायक निरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या, एपीएमसी पोलीस ठाण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 06:02 IST

incident at APMC police station, Navi Mumbai : काही दिवसांपासून ते वैद्यकीय सुट्टीवर गेले होते. परंतु रविवारी सकाळी ते पोलीस ठाण्यात आले असता, १७ तारखेपासून कामावर रुजू होणार असल्याचे उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना सांगत होते.

नवी मुंबई : सहायक पोलीस निरीक्षकाने स्वतःच्या शासकीय पिस्तूलमधून छातीत गोळी  झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी एपीएमसी पोलीस ठाण्यात घडली. भूषण पवार असे आत्महत्या केलेल्या सहायक निरीक्षकाचे नाव आहे. काही दिवसांपासून ते वैद्यकीय सुट्टीवर गेले होते. परंतु रविवारी सकाळी ते पोलीस ठाण्यात आले असता, १७ तारखेपासून कामावर रुजू होणार असल्याचे उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना सांगत होते. यानंतर ते अधिकाऱ्यांसाठी असलेल्या खोलीत गेले. त्यांनी दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर काही वेळातच आतून गोळी सुटल्याचा आवाज आल्याने पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी दरवाजा उघडला असता आतमध्ये पवार हे रक्तबंबाळ अवस्थेत आढळले. त्यांच्या छातीत गोळी लागलेली होती. यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.पवार हे शिस्तप्रिय व शांत अधिकारी म्हणून परिचित होते. पवार यांना २००७ मध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतश्री मिळालेला होता. वर्षभरापूर्वी त्यांची तपास विभागातून जनरल विभागात बदली करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांपासून ते मानसिक तणावात होते.  त्यांच्या तणावाचे व आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई