शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी आणि सासऱ्यावर प्राणघातक हल्ला, आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 01:17 IST

पत्नीची शेती आणि राहते घर आपल्या नावावर करून द्यावे म्हणून एका आरोपीने पत्नीला आणि सासऱ्याला लाकडी दांड्याने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पत्नीची शेती आणि राहते घर आपल्या नावावर करून द्यावे म्हणून एका आरोपीने पत्नीला आणि सासऱ्याला लाकडी दांड्याने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. विकी मंगल पाटोते (वय ३०) असे आरोपीचे नाव असून तो शांतिनगर इसासनी येथे राहतो. आरोपी विकीची पत्नी रविना लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहे. आरोपी विकी हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. पत्नीने शेती आणि राहते घर आपल्या नावावर करून द्यावे, यासाठी तो तिला अनेक दिवसापासून त्रास देत आहे. गुरुवारी रात्री १० च्या सुमारास त्याने याच कारणावरून पत्नीसोबत वाद सुरू केला. रविनाने वाद टाळण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आरोपीने आक्रमक होऊन तिच्या डोक्यावर फावड्याच्या दांड्याने फटका मारला. ती गंभीर जखमी झाल्याचे पाहून तिचे वडील गणपतराव मुलीच्या मदतीला धावले असता आरोपीने त्यांचेही डोक्यावर लाकडी दांड्याने मारून गंभीर जखमी केले. आरडाओरडा ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी आरोपीला पकडले. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन आरोपी विकी पाटोते याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.दोघांनी लावला गळफासशहरातील विविध भागात दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. कामठी मार्गावरील टेका नाका परिसरात राहणारे सुरेश राजेंद्र खोब्रागडे (वय ५५) यांनी ग्रामीण आरटीओ ऑफिसच्या मागे असलेल्या झुडपी जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीवरून कपिल नगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येची दुसरी घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. झिंगाबाई टाकळी जुनी वस्तीतील झेंडा चौकात राहणाऱ्या आशाबाई अशोक आंबाडरे (वय ४७) यांनी शुक्रवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांचा मुलगा आशिष यांनी दिलेल्या सूचनेवरून मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. आशाबाईच्या आत्महत्येमागील कारण जाणून घेतले जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर