शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

स्टेशनवर झोपलेल्या मुलीवर अत्याचार; जुईनगर स्थानकातून रेल्वे पोलिसांनी केली एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 09:22 IST

मूळची जळगावची महिला रेल्वेने प्रवास करत असताना चुकून पनवेल स्थानकात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पनवेल रेल्वेस्थानकात प्लॅटफाॅर्मवर झोपलेल्या तीन वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी एकाला अटक केली असून तो कळंबोली पुलाखाली राहणारा बेघर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मुलीची आई लघुशंकेसाठी गेली असता काही मिनिटांमध्ये आरोपीने गैरकृत्य केले.

मूळची जळगावची महिला रेल्वेने प्रवास करत असताना चुकून पनवेल स्थानकात आली होती. यामुळे रात्र काढण्यासाठी ती तीन वर्षांच्या मुलीसोबत प्लॅटफाॅर्म क्रमांक एकवर झोपली होती. मध्यरात्री तीनच्या सुमारास महिला लघुशंकेसाठी गेली असता त्याठिकाणी मुलगी एकटीच झोपली होती. त्याचवेळी आलेल्या एका व्यक्तीने तिला उचलून स्थानकाच्या वाढीव बांधकामाच्या आडोशाला नेले. त्याने तिच्यावर अत्याचार करून पळ काढला होता. 

रेल्वेस्थानकात गुन्हेगारांचा शिरकाव

  घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाडवी यांनी विविध पथके तयार केली. दुपारच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आनंदकुमार यांनी जुईनगर स्थानकातून एका संशयिताला ताब्यात घेतले.   अधिक चौकशीत त्याने पीडितेवर अत्याचार केल्याची कबुली दिली. तो कळंबोली पुलाखाली राहणारा असून रात्रीच्या वेळी सर्वत्र भटकत असतो. त्याच्या या कृत्याने रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकात गुन्हेगारांचा शिरकाव होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्याने अशी काही कृत्ये केली आहेत का, याचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग