शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोनसाठी २५ हजार मागितले, नकार मिळाल्यानं मुलाकडून आईला काठीनं बेदम मारहाण अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 14:01 IST

माणूस इतका इतका क्रूर कसा असू शकतो असा प्रश्न पडावा अशा पद्धतीनं नराधम मुलानं स्वत:च्याच आईला बेदम मारहाण केली.

ज्या लेकराला आई नऊ महिने आपल्या गर्भात वाढवते आणि जगात आल्यावर बोट धरून चालायला शिकवते, अपार कष्ट घेते त्याच आईला मुलानं फक्त मोबाईल दिला नाही म्हणून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. माणूस इतका इतका क्रूर कसा असू शकतो असा प्रश्न पडावा अशा पद्धतीनं नराधम मुलानं स्वत:च्याच आईला बेदम मारहाण केली. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. महागडा मोबाईल घेण्याच्या हव्यासापोटी एका मुलानं आपल्याच आईला काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे आईच्या हाताला आणि पायाला जबर दुखापत झाली. यासोबतच आईची रडून-रडून खूप वाईट अवस्था झाली आहे. 

छिंदवाडा येथील पारसिया पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बडकुही चौकी परिसरातील दरबाई गावात राहणाऱ्या फुलवतीबाई यांना तिचा मुलगा विनोद याने मोबाईल घेण्यासाठी २५ हजार रुपये मागितले होते. कसेबसे आईने त्याला १५ हजार रुपये दिले आणि तेवढ्यातच मोबाईल घे असं सांगितलं. विनोदला २५ हजार रुपये न मिळाल्याने राग आला आणि त्याने आईने दिलेले १५ हजार रुपये जमिनीवर फेकून दिले. काठीनं बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

यानंतर जखमी वृद्ध आईला रुग्णवाहिकेच्या सहाय्यानं पारसिया येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आलं. मुलाच्या मारहाणीमुळे आईच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. रुग्णालयात जखमी आई फुलवतीबाई पती रमेश यादव यांच्या बाजूला बसून सतत रडत होत्या. घटनेची माहिती मिळताच महिलेच्या मुली आणि इतर नातेवाईकही रुग्णालयात पोहोचले. महिलेचा पती रमेश यादव याने सांगितले की, मोबाईल घेण्यासाठी पैसे हवेत म्हणून मुलाने आईला काठीनं बेदम मारहाण केली.

रुग्णालयात उपस्थित नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती कोळसा खाणीत काम करायचा आणि ते आता निवृत्त झाले आहेत. पेन्शनच्या रकमेतूनच घरखर्च भागवावा लागतो. त्यांची दोन्ही मुलं पैशासाठी आई आणि वडील दोघांशी भांडत राहतात. मुलीनं सांगितले की, मुलाच्या जाचाला कंटाळून आई-वडिलांना सासरच्या घरी राहायला बोलावलं होतं, मात्र मुलीच्या सासरी राहणं बरोबर नाही म्हणून ते घरीच राहून मुलाचा त्रास सहन करत होते. याआधीही एकदा मारहाणीमुळे दुखापत होऊन आईने विष प्राशन केलं होतं. मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईला मारहाण करणारा विनोद काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटल्याचं सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी