शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उधारी दिलेले पैसे मागितले, वादातून आई- मुलाकडून महिलेची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 19:07 IST

Murder Case : कबुलीसाठी आरोपीने पोलीस ठाण्याआधी कारागृह गाठले

कल्याण: मित्राला दिलेल्या उधारीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेची मित्राच्या आई आणि भावाने चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेतील चककीनाका शास्त्रीनगरमध्ये शनिवारी रात्री घडली. रंजना राजेश जैसवार असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी लालसादेवी आणि विजय राजभर या आई मुलावर कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हत्या केल्यानंतर दोघेजण घराला कुलूप लावून निघून गेले होते. मात्र रविवारी सकाळी ७  वाजता विजय हा स्वत: पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने हत्येची कबुली दिली. तत्पुर्वी तो माहीती देण्यासाठी आधारवाडी कारागृहाच्या ठिकाणी गेला होता.

रंजना ही कुटुंबासमवेत पूर्वेकडील चककीनाका परिसरात राहायची. तिचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय होता. याच परिसरात राहणा-या अजय अनंतलाल राजभर सोबत रंजनाची मैत्री होती. तीने अजयला 1 लाख रूपये उधार दिले होते. पैसे घेऊन बराच कालावधी झाला मात्र अजय पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. रंजना अजयच्या थेट घरी जाऊन पैसे मागत होती त्यामुळे अजयच्या घरच्यांबरोबर देखील तीचे वाद व्हायचे. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास  रंजना ही अजयच्या घरी गेली परंतू तो घरी नव्हता तीने अजयचा छोटा भाऊ  विजय आणि त्याची आई लालसादेवी हिच्याकडे पैशासाठी तगादा लावला. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. यावेळी संतापलेल्या विजय आणि लालसादेवीने घरातील चाकूने तीच्यावर सपासप वार केले. यात रंजना गंभीर जखमी झाल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. तीचे पती राजेश यांच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.आधी त्याने गाठले होते आधारवाडी कारागृह

धक्कादायक बाब म्हणजे तीची हत्या केल्यानंतर तीचा मृतदेह घरातच ठेवला आणि दरवाजाला बाहेरून कुलूप लावून दोघेजण कुलूप लावून तेथून निघून गेले होते. रविवारी सकाळी विजय कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गेला त्याने घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. तत्पुर्वी त्याने आधारवाडी कारागृह गाठले होते आणि  तेथील पोलिसांना त्याने हत्या केल्याची माहीती दिली. मात्र तेथील पोलिसांनी त्याला कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जायला सांगितले. विजयने दिलेल्या माहीतीवरून कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करीत विजयला ताब्यात घेतले. लालसादेवीचा शोध सुरू आहे.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसkalyanकल्याण