शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 17:35 IST

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते म्हणून अश्विनीने आदित्य आणि त्या मुलीमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण ती यशस्वी झाली नाही.

सोलापूर - अश्विनी केशापुरे आणि रोहित ठणकेदार यांच्या एकत्र आत्महत्येच्या घटनेला अश्विनीची आणि त्याच्या जीवलग मित्राची ताटातूट, त्याचे दुसऱ्या युवतीशी निर्माण झालेले स्नेह, नंतर सर्वच अन्य मित्रांनी तोडलेले संबंध ही पार्श्वभूमी आहे. अश्विनीने नैराश्यातून आत्महत्या करण्याचं ठरवले. त्यामुळे आधीच घरातील नातेसंबंधाची गोपनीय भावनिक माहिती समजल्यामुळे कमालीचा निराश झालेल्या रोहितनेही तिच्याबरोबरच एकाच स्कार्फला गळफास घेऊन जीवन संपवले अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 

खरेतर शाळेपासूनचे सहा मित्र आणि त्यांच्या मैत्रिणीची ही गोष्ट...त्यातील रोहित अन् अश्विनी एकमेकांना भाऊ बहीण मानत होते. रोहितचा जवळचा मित्र आदित्य होता, तो अश्विनीचा जीवलग मित्र बनला पण दीड वर्षापासून अश्विनीची तिच्या जीवलग मित्रापासून ताटातूट झाली. त्याच दरम्यान आदित्यला जीवलग मैत्रिण मिळाली. रोहितचा दुसरा मित्र राज यालाही एक मैत्रिण होती. आदित्यचा दुरावा अश्विनीला सहन होत नव्हता. यामुळे ती त्याला पुन्हा पूर्वीप्रमाणे बोलण्यासाठी प्रयत्न करत होती. यासाठी प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते म्हणून अश्विनीने आदित्य आणि त्या मुलीमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण ती यशस्वी झाली नाही.

वारंवार मित्र मैत्रिणींमध्ये भांडण होत असल्याने ग्रुपमधील सहा जणांनी ८ जून रोजी रुपाभवानी मंदिर परिसरात बैठक घेतली. या बैठकीत भांडणाचे मूळ कारण अश्विनीच असल्याचे कळालं, त्यानंतर ग्रुपमधील चार जणांनी रोहित आणि अश्विनीचा मोबाईल ब्लॉक केला अन् संबंध तोडून टाकले. यामुळे रोहित आणि अश्विनी कमालीचे तणावात गेले होते. जीवलगाबरोबरच्या मैत्रीत आलेला दुरावा अन् नंतर सर्व मित्रांनी तोडलेले संबंध यामुळे अश्विनीने थेट आत्महत्या करण्याचे ठरवले. रोहित हा कर्णिकनगरमधील एका घरामध्ये असताना अश्विनी तिथे आली. तिने आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी रोहितला आपल्या कुटुंबातील नातेसंबंधाबाबत काही ठाऊक नसलेली भावनिक माहिती कळाली. त्यामुळे तो आधीच तणावात होता. त्यानंतर मित्रांनी संबंध तोडून दिल्याने तणाव आणखी वाढला होता. याचवेळी अश्विनीने आणि रोहितने एकाच स्कार्फला गळफास घेत स्वत:ला संपवले. 

माझ्या भांगेत कुंकू भर

आत्महत्येपूर्वी अश्विनीने लिहलेल्या चिठ्ठीत तू माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. तुझ्यावर माझा सगळ्यात जास्त जीव आहे. हे तू ओळखायला हवे होते, यामुळे मी गेल्यावर माझ्या भांगेत तू कुंकू भर असे अश्विनीनं चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

चौघांचा जबाब नोंदविला

रोहित अन् अश्विनीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी त्यांच्या चार मित्र मैत्रिणींचा जबाब -नोदविला आहे. उद्या मयतांना आई -वडिलांना बोलावून चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिली. दरम्यान रोहितवर दुपारी रूपाभवानी हिंदू स्मशानभूमीत; तर अश्विनीवर रूद्रभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोघांचे पालक अन् नातेवाईकांनी आक्रोश केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी