शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

Aryan Khan Drug Case: ...तर आर्यन पुन्हा करेल अमली पदार्थांचे व्यवहार; विशेष न्यायालयाने नोंदवले निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 08:49 IST

व्हॉट्सॲप चॅटवरून सकृतदर्शनी आर्यन खान हा अमली पदार्थ विक्रेत्यांच्या संपर्कात असल्याचे सिद्ध होते, असे निरीक्षण विशेष न्या. व्ही. व्ही. पाटील यांनी नोंदविले. 

मुंबई : आर्यन खानच्या व्हॉट्सॲप चॅटवरून तो अमली पदार्थांसंदर्भात नियमित व्यवहार करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याची जामिनावर सुटका केली तरी पुन्हा असे कृत्य करणार नाही, याची खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे तपास सुरू असताना त्याची जामिनावर सुटका करणे योग्य नाही,  असे निरीक्षण विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळताना नोंदविले.व्हॉट्सॲप चॅटवरून सकृतदर्शनी आर्यन खान हा अमली पदार्थ विक्रेत्यांच्या संपर्कात असल्याचे सिद्ध होते, असे निरीक्षण विशेष न्या. व्ही. व्ही. पाटील यांनी नोंदविले. न्यायालयाने २१ पानांच्या निकालात म्हटले आहे की, आर्यन खान व त्याचा मित्र अरबाज मर्चंट यांनी अमली पदार्थ बाळगले होते. आर्यनच्या ताब्यातून अमली पदार्थ जप्त करण्यात आले नसले तरी अरबाजकडे अमली पदार्थ आहे, याची माहिती आर्यनला होती.आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा यांचा गंभीर गुन्ह्यातील सहभाग पाहता ते जामिनावर सुटण्यास पात्र नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. एनसीबीने सादर केलेल्या साहित्यावरून एनडीपीएस कायद्यातील कलम २९ जे कट रचण्यासंबंधी आहे, ते या प्रकरणी लागू होते. आरोपीने एनडीपीएस कायद्याअंतर्गत कोणताही गुन्हा केला नाही, असे समाधान तपासाच्या या टप्प्यावर मानणे योग्य नाही, असे निकालात म्हटले आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंटने डे दिलेल्या जबाबानुसार, त्यांनी आनंद लुटण्यासाठी व सेवन करण्यासाठी अमली पदार्थ बाळगले होते, असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे.‘अरबाजने अमली पदार्थ लपविल्याचे माहीत होते’अर्थ आरोपी क्र. १ (आर्यन खान) याला आरोपी क्र. २ (अरबाज मर्चंट) याने बुटांमध्ये अमली पदार्थ लपविल्याची माहिती होती. तसेच आरोपी क्र. १ च्या व्हॉट्सॲप चॅटवरून तो मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ खरेदीबाबत चर्चा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून आरोपी क्र. १ बेकायदेशीरपणे अमली पदार्थ बाळगणाऱ्यांच्या संपर्कात होता. याचा अर्थ एनसीबीने कटाचा आणि अन्य लोकांना प्रवृत्त (अमली पदार्थाचे सेवन) केल्याचा लावलेला आरोप सकृतदर्शनी योग्य आहे,’ असेही या निकालात म्हटले आहे.गुरुवारी उच्च न्यायालयात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा यांच्या जामिनावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खान