शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

आर्यन खान हा ड्रग्जचा नियमित ग्राहक; तो अमली पदार्थ पुरवत असल्याचे पुरावे - NCB

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 15:22 IST

Aryan Khan Bail Hearing Update : एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांचा युक्तिवाद आता सुरु झाला आहे. 

ठळक मुद्देया युक्तिवादादरम्यान एनसीबीच्या वकिलांनी आर्यन खान हा ड्रग्जचा नियमित ग्राहक आहे आणि तो अमली पदार्थ पुरवत असल्याचे सिद्ध करणारे पुरावे आमच्याकडे आहेत, असा महत्वपूर्ण दावा केला.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली होती. मात्र, ती सुनावणी अपूर्ण राहिल्याने आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जांवर आता उर्वरित सुनावणी काल पार पडली. आर्यनतर्फे युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला होता. तर काल अरबाझ मर्चंट आणि मुनमून धमेचातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. मात्र एनसीबीचा युतीवाद राहिल्याने न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आज सुनावणी ठेवली. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांचा युक्तिवाद आता सुरु झाला आहे. 

या युक्तिवादादरम्यान एनसीबीच्या वकिलांनी आर्यन खान हा ड्रग्जचा नियमित ग्राहक आहे आणि तो अमली पदार्थ पुरवत असल्याचे सिद्ध करणारे पुरावे आमच्याकडे आहेत, असा महत्वपूर्ण दावा केला. काल अरबाज आणि मुनमुन यांच्या वकिलांचा युक्तिवाद संपला असून एनसीबीचा युक्तिवाद आता सुरु आहे. 

काल युक्तिवादादरम्यान अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई यांनी रेव्ह पार्टीमध्ये सेवन करताना एनसीबी आरोपींना पकडते आणि नंतर त्यांची त्वरित रक्त तपासणी केली जाते. मात्र, या प्रकरणात एनसीबीने ते केलेले नाही असे हायकोर्टाला सांगितले होते. 

ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी एनसीबीने मांडलेल्या कट करस्थानाच्या थिअरीमध्ये आरोपी असलेल्या याच प्रकरणातील दोघांना काल विशेष एनडीपीएस कोर्टानेही जामीन मंजूर केला. क्रूझ परत आल्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी एनसीबीने त्यांना सेवनाच्या आरोपाखाली अटक केली होती. एनसीबीच्या दाव्याप्रमाणे, अरबाज मर्चंटने जबाबात चरस बाळगल्याचे मान्य केले आणि आर्यनसोबत सेवन करण्यासाठी जात होतो, असेही मान्य केले. मात्र, त्या जबाबाविषयी त्यानं माघार घेतली आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या तुफान सिंह निवाड्याप्रमाणे एनसीबी अधिकाऱ्यासमोर दिलेला जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. शिवाय त्या जबाबातही केवळ अमली पदार्थ सेवनाविषयी कबुली आहे. त्यामुळे केवळ तेवढेच कलम लागू होते. कट करस्थानाचा भागच नाही असा युक्तिवाद केला होता. 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोHigh Courtउच्च न्यायालयadvocateवकिलDrugsअमली पदार्थ