शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Aryan Khan Drugs Case: ड्रग्स केसवरून आर्यन खान संतापला, म्हणाला - तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 13:57 IST

Aryan Khan On Drugs Case: आता एनसीबी डेप्युटी डायरेक्टर जनरल संजय सिंह यांनी इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत आर्यन खानच्या वक्तव्याचा खुलासा केला आहे.

Aryan Khan On Drugs Case: बॉलिवूड किंग शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स केसमधून निर्दोष सुटला आहे. 2 ऑक्टोबर 2021 ला किंग खानचा मुलगा आर्यन याला ड्रग्स केसमध्ये अटक केली होती. काही आठवडे त्याला तुरूंगात घालवावी लागली. तो तुरूंगातून बाहेर आल्यापासून शाहरूख खान आणि त्याच्या परिवाराने यावर काहीच वक्तव्य केलं नव्हतं. पहिल्यांदाच आर्यन खान याने यावर व्यक्त केलेलं मत समोर आलं आहे.

आता एनसीबी डेप्युटी डायरेक्टर जनरल संजय सिंह यांनी इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत आर्यन खानच्या वक्तव्याचा खुलासा केला आहे. संजय खान यांनी सांगितलं की, ते ड्रग्स केसबाबत आर्यन खानसोबत बोलण्यासाठी  गेले होते. तेव्हा आर्यन खान बिनधास्तपणे याबाबत बोलला आणि म्हणाला की, मी लायक होतो का?

आर्यन खान पहिल्यांदा ड्रग्स केसबाबत संजय सिंहला म्हणाला होता की, 'सर, तुम्ही मला इंटरनॅशनल ड्रग्स तस्कर बनवलं. मी ड्रग्समध्ये पैसे लावतो. ह आरोप खोटे नाहीत का? त्यांना माझ्याकडे ड्रग्स सापडलं नाही. तरीही त्यांनी मला अटक केली. सर, तुम्ही माझ्यासोबत फार चुकीचं केलं आणि माझी प्रतिष्ठा मातीत मिळवली. मला इतके दिवस तुरूंगात का घालवावे लागले? खरंच हे मी डिझर्व करतो का?. संजय सिंह असेही म्हणाले की, शाहरूख खान त्यांना रडत म्हणाला होती की, लोक त्याला राक्षस म्हणून चित्रित करतात. पण तो आणखी मजबूत होत आहे. 

दरम्यान, ड्रग्स केसप्रकरणी अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्लीन चिट देण्यात आली आहे. एनसीबीने आपल्या चार्जशीटमध्ये लिहिलं आहे की, आर्यन खान विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. म्हणजे एनसीबीला आर्यन खानने ड्रग्स घेतल्याचे किंवा त्याच्याकडे ड्रग्स असल्याचे पुरावे सापडले नाहीत.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोShahrukh Khanशाहरुख खान