शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Aryan Khan : आर्यन खानला क्लीन चिट, कार्डेलिया क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी NCB कडून आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 14:11 IST

Aryan Khan : एनसीबीकडून आज पहिले आरोपपत्र सादर कोर्टात सादर करण्यात आलं. त्यात आर्यन खान आणि मोहककडे ड्रग्ज सापडले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. 

मुंबई :  कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या अटक प्रकरणात आरोपपत्र सादर करण्यासाठी न्यायालयाने वाढवून दिलेला ६० दिवसांचा अवधी या महिन्यात संपला. एनसीबीकडून आज पहिले आरोपपत्र सादर कोर्टात सादर करण्यात आलं. त्यात आर्यन खान आणि मोहककडे ड्रग्ज सापडले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. 

मुंबईतील प्रसिद्ध क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनला मोठा दिलासा मिळाला आहे. आर्यन खानला कोर्टाकडून क्लीन चिट मिळाली आहे. नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शुक्रवारी एनडीपीएस कोर्टात आरोपपत्र सादर केले. दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्यन खानच्या नावाचा समावेश नव्हता. ड्रग्ज प्रकरणात आर्यनविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही.आर्यन खानला मोठा दिलासाक्रूझ ड्रग्स प्रकरणात मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंटला चार्टशीटमध्ये क्लीन चिट मिळालेली नाही. दोघांचाही ड्रग्ज प्रकरणात आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. अरबाज मर्चंट हा स्टार किड आर्यन खानचा मित्र आहे. चार्टशीटमध्ये ६ जणांविरुद्ध पुरावे नसल्याचे लिहिले आहे. आर्यन खान, अविन साहू, गोपाल जी आनंद, समीर सैघन, भास्कर अरोरा, मानव सिंघल यांचा समावेश आहे, ज्यांच्या विरोधात पुरावे सापडले नाहीत. उर्वरित 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना क्लीन चिट मिळालेली नाही. आता या 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

एनसीबीने गेल्या वर्षी क्रूझवर छापेमारी करत आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह काहींना ताब्यात घेतले होते. एनसीबीने आर्यन खान याला गेल्या वर्षी ३ ऑक्टोबरला अटक केली होती. आर्यनला २८ ऑक्टोबरला जामीन मिळाला होता. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या कटाचा भाग असल्याचे सिद्ध करण्यासारखे कोणतेही पुरावे न सापडलेले नाहीत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानला जामीन मंजूर केला होता.  एनसीबीला याप्रकरणात २ एप्रिलपर्यंत हे आरोपपत्र दाखल करायचे होते. मात्र, एनसीबीच्या या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आरोप झाल्यामुळे  तपास रखडला. एनसीबीच्या मुंबई विभागाचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडे यांची बदली झाली. त्यामुळे याप्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीच्या विशेष समितीने मार्चच्या अखेरीस मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करून आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ मागितली होती. मात्र न्यायालयाने एनसीबीला ६० दिवसांची मुदत दिली होती. 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोCourtन्यायालय