शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

Aryan Khan Drugs Case: एनसीबीचे अधिकारी मन्नतवर आल्यावर शाहरुख म्हणाला, 'तुम्ही चांगले काम करताय, फक्त...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 22:32 IST

NCB visit to Shahrukh Khan's Mannat: आज बॉलिवूड किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये गेला होता. आर्यन-शाहरुख यांच्यात १५-२० मिनिटं संवाद झाला. त्यानंतर एनसीबी त्याच्या घरी गेली होती.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि आर्यन खानसमोर (Aryan Khan) संकटे वाढत चालली आहेत. आर्यन खानला जामिन फेटाळल्याने आज शाहरुख त्याला भेटण्यासाठी ऑर्थर रोड तुरुंगात गेला होता. 3 ऑक्टोबरपासून आर्यन खान आधी एनसीबी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत आहे. आज एनसीबीची (NCB) टीम शाहरुखच्या मन्नत (Mannat) बंगल्यावर गेली होती. तेव्हा शाहरुख खुपच हतबल झाल्याचे दिसला. 

एनसीबी शाहरुख खानला नोटिस देण्यासाठी गेली होती. शाहरुखने स्वत: ही नोटीस घेतली. यावेळी बंगल्यावर आलेल्या एनसीबी अधिकाऱ्यांना तुम्ही चांगले काम करत आहात, माझा मुलगा लवकरात लवकर तुरुंगातून बाहेर यावा अशी अपेक्षा आहे, असे सांगितले. आर्यन खानकडे जर कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस असेल तर ते एनसीबीकडे जमा करावे, असे त्या नोटीसीमध्ये म्हटले आहे. शाहरुखच्या घरी व्ही व्ही सिंह गेले होते. त्यांनी म्हटले होते की, तपासाचे काही कागदोपत्री कारवाई राहिली होती. ती पूर्ण करण्यासाठी ते आले होते. आपले काम झाल्यावर अधिकाऱ्यांटी टीम मन्नतवरून निघाली. 

आर्यन खान याच्यासह अटकेत असलेल्या इतरांच्या न्यायालयीन कोठडीत आता ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आर्यन खानच्या जामीनासाठी गेल्या १६ दिवसांत ४ वेळा जामीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.एनसीबीच्या मागणीनुसार मुंबई हायकोर्टात आता मंगळवारी आर्यन खानच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे सध्या तरी आर्यन खानला मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातच राहावं लागणार आहे.

आज बॉलिवूड किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये गेला होता. आर्यन-शाहरुख यांच्यात १५-२० मिनिटं संवाद झाला. चर्चेवेळी दोघांमध्ये काचेची भिंत होती. दोन्ही बाजूने इंटरकॉम होता. कुठल्याही सामान्य आरोपीच्या नातेवाईकांना भेटायला जातात तसं शाहरूखनं आरोपी आर्यनची भेट घेतली. त्याला कुठलीही विशेष ट्रिटमेंट दिली नाही. मुलाखतीची वेळ संपताच शाहरूख स्वत:चा बाहेर पडला.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानShahrukh Khanशाहरुख खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी