शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Aryan Khan Drugs Case: फरार किरण गोसावीही म्हणतोय माझ्या जिवाला धोका, वृत्तवाहिन्यांना मुलाखतीचा सपाटा, लखनौमध्ये शरण येण्याची दर्शवली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 09:59 IST

Aryan Khan Drugs Case: एनसीबीच्या कारवाईवेळी गोसावी एखाद्या अधिकाऱ्यांच्या थाटात आर्यन खानच्या दंडाला धरून कार्यालयात नेत असल्याचे व्हिडिओ समोर आले होते. गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीला पंच केल्याबद्दल टीका होऊ लागल्यानंतर गोसावी पुन्हा फरार झाला.

मुंबई : क्रूझवरील  कारवाईतील वादग्रस्त पंच आणि अनेक गुन्ह्यांत फरार असलेल्या  किरण गोसावीलाही आता आपल्या जिवाला धोका असल्याची भीती वाटू लागली आहे. त्याचा बॉडीगार्ड व अन्य पंच प्रभाकर साईल याने त्याच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर सोमवारी अचानकपणे त्याने विविध वृत्तवाहिन्यांशी संपर्क साधून आपली बाजू मांडू लागला आहे. त्याचबरोबर आपण उत्तर प्रदेशातील लखनौ पोलिसांसमोर हजर होणार असल्याचे एका  वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. 

एनसीबीच्या कारवाईवेळी गोसावी एखाद्या अधिकाऱ्यांच्या थाटात आर्यन खानच्या दंडाला धरून कार्यालयात नेत असल्याचे व्हिडिओ समोर आले होते. गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीला पंच केल्याबद्दल टीका होऊ लागल्यानंतर गोसावी पुन्हा फरार झाला. सोमवारी त्याचा बॉडीगार्ड साईलने आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या किरण गोसावीचा अखेर ठावठिकाणा लागला. त्याने वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधीशी संवाद साधून सर्व आरोप फेटाळले.

गोसावीकडून पुणे पोलिसांशी संपर्क नाहीकॅडेलिया क्रूझ पार्टी प्रकरणातील साक्षीदार आणि पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढलेला किरण गोसावी याचा पुणे पोलीस शोध घेत असून, त्याच्याकडून शरण येण्याबाबत संपर्क साधला नसल्याचे पोलीस उपायुक्त डॉ.प्रियंका नारनवरे यांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढली आहे. तर गेल्या आठवड्यात गोसावी याची व्यवस्थापक शेरबानो मोहम्मद इरफान कुरेशी (२७, रा.गोवंडी) हिला पुणे पोलिसांनी अटक केली होती. 

पूजा ददलानी यांच्याशी भेट नाहीआर्यन खानला अटक केल्यानंतर तीन ऑक्टोबरनंतर अनेक खंडणीचे कॉल आले. त्यावर राजकारण सुरू आहे, माझ्या जिवाला धोका असून पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे, साईलचे आरोप निराधार आहेत. मी कोणतीही खंडणी मागितली नाही. शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीसोबत कधीही भेट झाली नाही, असा दावा त्याने केला.

तो सेल्फी क्रूझवर काढलामला माझ्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार एनसीबीला ही माहिती दिली होती. त्यानंतर क्रूझवर कारवाई करण्यात आली होती. आर्यन खानसोबत जो सेल्फी काढला होता, तो सेल्फी एनसीबीच्या ऑफिसमध्ये काढला नव्हता, तर तो क्रूझवर काढला होता, असा दावाही गोसावी याने केला आहे.

समीर वानखेडे प्रकरणी मुख्यमंत्री-गृहमंत्री यांची चर्चाएनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्यासंदर्भातील घडामोडींबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चर्चा केली. वानखेडे यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासंदर्भातही यावेळी दोघांमध्ये चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. वानखेडे यांच्यावरील आरोपांसंदर्भात एफआयआर दाखल करायचा तर तशी तक्रार आधी पोलिसांकडे द्यावी लागते. तशी तक्रार आल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे ते म्हणाले. मलिक यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात ते म्हणाले की, मलिक नांदेडला असून परतल्यावर त्यांचे काय म्हणणे आहे हे मी ऐकून घेईन. 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी