शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Aryan Khan: अमेरिकेत असताना गांजा प्यायचो, आर्यन खानची एनसीबीसमोर कबुली, आरोपपत्रात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 18:39 IST

Aryan Khan News: एनसीबीकडून दाखल करण्यात आलेल्या चार्जशिटमध्ये आर्यनचं नाव घेण्यात आलेलं नाही. मात्र चौकशीमध्ये आपण गांजा घेत असल्याचे आर्यन खान याने कबूल केल्याचे एनसीबीने आरोपत्रात नमूद केले आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात क्लीनचिट मिळाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील क्रूझवरील ड्रग्स पार्टीत आर्यन खानचं नाव आलं होतं. मात्र आता एनसीबीकडून दाखल करण्यात आलेल्या चार्जशिटमध्ये आर्यनचं नाव घेण्यात आलेलं नाही. मात्र चौकशीमध्ये आपण गांजा घेत असल्याचे आर्यन खान याने कबूल केल्याचे एनसीबीने आरोपत्रात नमूद केले आहे.

एनसीबीने शुक्रवारी मुंबईतील कोर्टामध्ये चार्जशिट दाखल केली होती. यामध्ये ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २० पैकी १४ जणांची नावं आहेत. मात्र आर्यन खानसह सहा जणांची नावं या आरोपपत्रामध्ये नाही आहेत, अशा परिस्थितीत आरोपपत्रामध्ये आर्यन खानने तो गांजाचं सेवन करत असल्याचं एनसीबीच्या चौकशीतून समोर आलं आहे.

आरोपत्रात नमूद असलेल्या माहितीनुसार आर्यन खानने आपल्या जबाबात सांगितलं की, त्याने २०१८ मध्ये अमेरिकेत असताना गांजा पिण्यास सुरुवात केली होती. अमेरिकेमध्ये आर्यन खान तेव्हा कॉलेजचं शिक्षण घेत होता. त्यावेळी त्याला निद्रानाशाचा त्रास होत होता. तेव्हा त्याने गांजा पिणे हे या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी मदतगार ठरू शकते, असे कुठेतरी वाचले होते.

दरम्यान, आर्यन खानच्या फोनमध्ये मिळालेलं व्हॉट्सअॅप चॅट त्यानेच केल्याचे आर्यन खानने मान्य केल्याचे एनसीबीने म्हटले आहे. आरोपपत्रानुसार आर्यन खानने एनसीबीला सांगितले की, तो मुंबईमधील वांद्रे येथील एका डिलरला ओळखतो. मात्र त्या डिलरचं नाव आणि आणि लोकेशन त्याला माहिती नाही. तो डिलर त्याचा मित्र अचित याच्या ओळखीचा आहे. दरम्यान, अचित यालाही ड्रग्स प्रकरणात पकडण्यात आले होते. 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो