शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना शहरप्रमुखासह दोघांना अटक; पैसे चोरल्याच्या आरोप : एक दिवसाची कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 05:57 IST

एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षात वाद आहे. दोन्ही गटांकडून शिवसेनेवर दावा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : पश्चिमेतील दीनदयाळ रोडवरील शिवसेना शाखेत शुक्रवारी झालेला वाद विकोपाला गेला आहे. शहरप्रमुख विवेक खामकर यांनी पैसे आणि कागदपत्रे चोरल्याच्या आरोपावरून विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी खामकरसह अन्य एकाला अटक केली आहे. या दोघांना पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले असता दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षात वाद आहे. दोन्ही गटांकडून शिवसेनेवर दावा केला जात आहे. दीनदयाळ रोडवरील शिवसेना शाखेत शाखाप्रमुख परेश म्हात्रे आणि पवन म्हात्रे हे दोघे बसलेले असताना तेथे खामकर व त्यांचे समर्थक पोहोचले. खामकर यांनी परेश यांच्याकडे विचारणा केली की, तुम्ही कोणत्या गटात आहात. त्यावेळी परेश यांनी आम्ही शिवसेनेत आहोत. आम्ही कोणत्याही गटात गेलेलो नाही, असे सांगितले. त्यानंतर खामकर शाखेबाहेर आले. तेथे त्यांनी शाखेबाहेर एक बॅनर पाहिला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेही फोटो होते. ते पाहून खामकर यांनी तो बॅनर फाडला. म्हात्रे यांनी त्यांना मज्जाव केला असता त्यांच्यात झटापट झाली. दरम्यान, शाखेतील टेबलावर ठेवलेले महत्त्वाचे कागदपत्र आणि १५  हजार रुपये असलेली पिशवी गायब झाली. याप्रकरणी म्हात्रे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी खामकर, श्याम चौगुले यांच्याविरोधात पैसे चोरल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे.

शिंदे-सेना गटातील वादातून प्रकार    शिंदे यांच्या राजकीय बंडानंतर डोंबिवलीचे शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे हे शिंदे यांना पाठिंबा देत त्यांच्या गटात सामील झाले.     त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डोंबिवली शहरप्रमुखपदी खामकर यांची नियुक्ती केली होती.     शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वादातून खामकर यांच्यावर पैसे चोरी आणि बॅनर फाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.     पोलीस तपासाअंतीच या आरोपात किती तथ्य आहे, हे स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे