शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 17:28 IST

आरोपीकडून चोरी केलेली चेन व गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे. 

मंगेश कराळे

नालासोपारा :- विरारमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्ध इसमाच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून चोरी केलेली चेन व गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली आहे. 

विरारच्या भाऊ नगर, विवा कॉलेज जवळ, कुणाल बिल्डिंगमध्ये राहणारे श्रीनिवास नगीना शुक्ला (६७) हे २५ सप्टेंबरला सकाळी साडेसातच्या सुमारास विवा कॉलेज डी मार्ट रोडवरून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे तेरा ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पळून गेला होता.  अर्नाळा पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयातील वसई विरारमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जबरी चोरीचे प्रमाण वाढल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपींचा शोध घेऊन पायबंध घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडे दिला होता. 

सदर गुन्हयाचा तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अनुज गंगाराम चौगुले (३३) याला २९ सप्टेंबरला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि जबरी चोरी केलेली सोन्याची चेन असा १ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीचा पूर्व इतिहास पडताळून पाहिल्यावर मुंबई, सातारा, पालघर, मध्यप्रदेश येथे सुपारी घेऊन खून करणे, दरोडा, जबरी चोरी, पोलीस कोठडीतून पळून जाणे, चोरी असे २५ पेक्षा जास्त व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

वरील कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजित टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे म.सु.ब. प्रविण वानखेडे, सागर सोनवणे, गणेश यादव तसेच सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी