शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रिपल तलाक प्रकरणी अटक पतीचा जामीन फेटाळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 20:42 IST

विशेष म्हणजे जन्नत सात महिन्यांची गर्भवती असताना पतीने तिला मोबाइलवरून तलाक दिला.

ठळक मुद्देट्रिपल तलाक कायदा लागू झाल्यानंतर देशातील पहिलाच गुन्हा मुंब्य्रात दाखल इम्तियाजने शनिवारी ठाणे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

ठाणे -  ट्रिपल तलाक प्रकरणातील मुंब्रा येथील आरोपी पती इम्तियाज पटेल याचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश (चौथे) व्ही.वाय. जाधव यांनी सोमवारी फेटाळला. सासू रेहना पटेल (६०) आणि नणंद सुलताना खान (४०) या दोघींना मात्र सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. ट्रिपल तलाक कायदा लागू झाल्यानंतर देशातील पहिलाच गुन्हा मुंब्य्रात दाखल झाल्याने आरोपींच्या जामीन अर्जाकडे अनेकांचे लक्ष होते.या प्रकरणातील फिर्यादी जन्नत बेगम इम्तियाज पटेल (३२) यांचे म्हणणे ऐकल्यानंतरच जामीन अर्जावर सुनावणी केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानुसार, सोमवारी जन्नत यांची बाजू ऐकल्यानंतर न्या. जाधव यांनी इम्तियाज याचा जामीन अर्ज फेटाळला. ट्रिपल तलाक कायद्यान्वये १ ऑगस्ट २०१९ रोजी जन्नत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती इम्तियाज, सासू रेहना आणि नणंद सुलताना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. इम्तियाजने पत्नी जन्नत हिला ३० नोव्हेंबर २०१८ रोजी व्हॉट्स अ‍ॅपवरून तलाक दिला होता. विशेष म्हणजे जन्नत सात महिन्यांची गर्भवती असताना पतीने तिला मोबाइलवरून तलाक दिला. शिवाय, त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत, ही बाब सरकारी वकील संजय मोरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली. पत्नी सात महिन्यांची गर्भवती असताना पती अशा प्रकारे तलाक देत असेल, तर त्याची मानसिकता दिसून येते. त्याने ज्या मोबाइलवरून हा तलाक दिला, तो मोबाइल आणि त्याला सास:याने दिलेली मोटारसायकल त्याच्याकडून जप्त करायची असल्यामुळे त्याला जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी अ‍ॅड. मोरे यांनी केली. या सर्व बाबी ग्राह्य धरून न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला. सासू रेहना आणि नणंद सुलताना यांनी चौकशीला सहकार्य करणो, पोलीस ठाण्यात हजेरी लावणो, तसेच जन्नत हिला कोणत्याही प्रकारे धमकावू नये, अशा अटींवर न्यायालयाने जामीन मंजूर केला. इम्तियाजने शनिवारी ठाणे जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर सोमवारी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला. आरोपीच्या वतीने  अ‍ॅड. ए.ए. फकी यांनी, तर फिर्यादी तसेच सरकारच्यावतीने अ‍ॅड. संजय मोरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकCourtन्यायालयthaneठाणेmumbraमुंब्रा