शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
7
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
8
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
9
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
10
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
11
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
12
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
13
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
14
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
15
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
16
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
17
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
18
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
19
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
20
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!

प्रश्नपत्रिका फुटल्याने लष्कर भरतीची परीक्षा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 07:05 IST

जानेवारीमध्ये एक तरुण मैदानी परीक्षेत पास झाला होता. त्यानंतर ५ फेब्रुवारीला तो वैद्यकीय चाचणीतही  पास झाला. ६ फेब्रुवारीला बॉम्बे सॅपर्समधून ॲडमिट कार्ड घेऊन बाहेर आल्यावर त्याला आझाद खान नावाची व्यक्ती भेटली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/पुणे : लष्करी जवानांच्या भरतीसाठी देशव्यापी पातळीवर घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने रविवारी ही परीक्षाच रद्द करण्यात आली. लष्कराची गुप्तचर संस्था आणि पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने त्याचा पर्दाफाश केला. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. बारामती येथून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर पुणे पोलिसांनी तीन जणांना अटक केल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. 

जानेवारीमध्ये एक तरुण मैदानी परीक्षेत पास झाला होता. त्यानंतर ५ फेब्रुवारीला तो वैद्यकीय चाचणीतही  पास झाला. ६ फेब्रुवारीला बॉम्बे सॅपर्समधून ॲडमिट कार्ड घेऊन बाहेर आल्यावर त्याला आझाद खान नावाची व्यक्ती भेटली. त्याने सध्या सुरू असलेल्या सोल्जर जीडी भरतीचे प्रमुख अख्तर खान व महेंद्र सोनावणे हे आपल्या परिचयाचे आहेत. त्यांना सैन्यात काही मुलांना भरती करायचे आहे. ३ लाख रुपये दिल्यावर तुझे काम होईल, असे त्याला सांगितले. त्याने २ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यांनी १ लाख आता व उरलेले काम झाल्यावर  द्यावे लागतील. परीक्षेचे प्रश्नसंच तुला देतो, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने आझाद याच्याकडे १ लाख रुपये दिले. त्याने काही सराव प्रश्नसंच व्हॉट्स ॲपवर पाठविले. त्यानंतर फिर्यादी  शनिवारी पुण्यात आला. त्याने तिघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी फिर्यादीशी संपर्क साधल्यावर त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीच्या मुलाने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी मूळचा सांगली जिल्ह्यातील तासगावचा आहे. अली अख्तर, महेंद्र सोनावणे, आझाद खान यांनी सर्वसाधारण सैन्य भरतीचे पेपर फोडून ते परीक्षेच्या आदल्या दिवशी उमेदवारांना पुरविणार असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली.लष्करातील भरतीमध्ये कोणतेही घोटाळे होऊ नयेत म्हणून आम्ही नेहमी दक्ष असतो. पात्र उमेदवारांची निवड अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणे अपेक्षित आहे. या परीक्षेत घोटाळे झाल्याने आता ती रद्द करण्यात येत आहे, असे लष्करी सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :examपरीक्षाIndian Armyभारतीय जवान