शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीपूजनालाच दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा; रात्रभर चोरट्यांचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 11:12 IST

अज्ञात दरोडेखोरांनी चाकू, कुऱ्हाडीचा व लाठ्या काठ्याचा वापर करत दोन महिलांसह तीन ते चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

सचिन सांगळे

नांदूरशिंगोटे, जि नाशिक : सिन्नर तालुक्यातील परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नांदूरशिंगोटे येथे रविवारी (दि.23) मध्यरात्री लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा टाकत सोन्यासह लाखोंचा ऐवज लुटल्याची घटना घडली. सात ते आठ दरोडेखोऱ्यांनी नांदूरशिंगोटे रात्रभर धुमाकूळ घातल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी चाकू, कुऱ्हाडीचा व लाठ्या काठ्याचा वापर करत दोन महिलांसह तीन ते चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासासाठी पथके तयार करण्यात आली आहे. दरोडेखोरांनी पाच घरांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला मात्र दोन बंगल्यात त्यांनी धाडसी घरफोडी केली. अडीच तास दरोडेखोरांनी मोठी दहशत निर्माण केली होती. एका बंगल्यात चोरीचा अयशस्वी प्रयत्न होत असताना बंगल्यात प्रवेश करताना दरोडेखोर सीसीटीव्हीत दिसून आले आहेत. दरम्यान दरोडेखोर व शेळके परिवारातील सदस्य यांच्या झटापटी घडल्या. 

 येथील जुन्या चासरोड लगत बांधकाम व्यावसायिक संतोष गंगाधर कांगणे यांचा कैलास स्मृती नावाचा बंगला आहेत. सदरच्या बंगल्यला दरोडेखोरांनी टार्गेट करत दहा ते बारा तोळे सोने तसेच पावणेतीन लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लांबविली. दरोडेखोरांनी वीस ते पंचवीस मिनिटे कांगणे यांच्या घरात धुमाकूळ घालत चाकूचा धाक दाखवत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांनी चाकू व हत्याराचा दाख दाखविल्याने  त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिकार न करता घरातील ऐवज चोरुन नेला. घरातील लहान मुलांनाही लक्ष केले. त्यानतंर दरोडेखोरांनी नाशिक - पुणे हायवे लगत अवघ्या एक हजार फुटावर अंतरावर असलेल्या वाळके वस्तीवरील बंगल्यला लक्ष केले. रमेश लक्ष्मण शेळके यांनी नुकताच दोन दिवसापूर्वी नवीन बंगल्यात प्रवेश करुन राहण्यासाठी आले होते. दरोडेखोरांनी बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करत शेळके यांच्या मातोश्री इंदुबाई लक्ष्मण शेळके यांना धमकावत कानातील सोन्याचे काप ओरबाडून नेले. तसेच त्यांना मारहाण केली तसेच शेळके यांच्या बेडरुमचा दरवाजा बंद करुन घेतला. मात्र त्यांची मुलगी आरोषी हिने दरवाजा उघडल्याने बाहेर येताच त्यांच्यात झटापट झाली. यावेळी सहा ते सात दरोडेखोरांचा शेळके परिवाराने प्रतिकार केल्याने दोहेजण जखमी झाले. दरम्यान पोलीस अधीक्षक शहाजी उमप, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांनी घटनास्थळी भेट देत पोलीसांना तपासाच्या सूचना दिल्या.

टॅग्स :Nashikनाशिक