शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

लसीकरण पथक असल्याचा बनाव करीत अकोटात भरदिवसा सशस्त्र दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 17:40 IST

Armed robbery in Akot : दरोडेखोरांनी घरातील तिघांना जबर मारहाण करुन तोडांत बोळे कोंबून दोराने एका खालीत बांधून ठेवले होते. 

- विजय शिंदे

अकोटः कोरोनाची लसीकरणाचे पथक असल्याचा बनाव करीत अकोट शहरात भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना ३१आँगस्ट घडली. या दरोडेखोरांनी घरातील तिघांना जबर मारहाण करुन तोडांत बोळे कोंबून दोराने एका खालीत बांधून ठेवले होते. या घटनेनंतर अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

शहरातील प्रचंड रहदारी असलेल्या जवाहररोड लगत बुधवार वेस परिसरात प्रसिद्ध व्यापारी अमृतलाल सेजपाल हे आपल्या कुंटबासह वरचे माळ्यावर राहतात. त्यांच्या घरी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० ते ३ वाजता दरम्यान काही महिला व पुरुष आले. त्यांनी दरवाजा वाजवून कोरोना लसीकरण चौकशी पथक असल्याचे बनाव केला. यावेळी दरवाजा वरच सेजपाल यांच्या नात देलिशा हिला मी विद्यार्थी असल्याने लस घेतली नाही सांगितले. त्यामुळे या बनावट पथकाने घरात कोणकोण आहे अशी विचारणा करताच देलिशा हिला शंका आल्याने तीने ओळखपत्र मागितले असता या दरोडेखोर टोळीतील एका महिलेने दरवाजा जोरात लोटत घरात घुसले. घरातील वयोवृद्ध अमृतलाल सेजपाल,त्यांची पत्नी इंदुबहन सेजपाल, नात देलिशा यांना मारहाण करीत तोडांत बोळे कोबंत चिकटपट्या लावल्या.तसेच

दोरीने बांधून एका खोलीत कोंडून ठेवले. अमृतलाल सेजपाल यांना सशस्त्र मारहाण करीत जखमी केले. त्यानंतर घरातील सामान फेकफाक करीत कपाट फोडली.

दरम्यान दुसरीकडे एका खोलीत बंद असलेल्या आबा-आजी व नातीने कशीतरी तोडांचे बोळ काढून खिडकीतून आरडाओरडा केली असता आजुबाजूचे शेजारी धावत आले.तोपर्यत दरोडेखोरांनी बाहेरून घराचा दरवाजा बंद करुन पळून गेले होते. दरम्यान शेजारच्या लोकांनी दरवाजा उघडून या तिघांची सुटका केली. तिघेही खुपच घाबरले होते. यावेळी अमृतलाल सेजपाल जखमी असल्याने त्यांच्यावर घरीच डॉ. विशाल इंगोले यांनी उपचार केले.

विशेष म्हणजे हा परिसर खुपच गजबजलेला असुन बाजारपेठ आहे. तर अमृतलाल सेजपाल यांचा मुलगा यश्वीन, सुन भावना व लहान नातु शौर्य हे बाहेरगावी खामगाव गेले होते. दरोडेखोरांनी तीचे जवळचा एक मोबाईल लंपास केला आहे. दरोडेखोरांनी घरातील किती रुपयांचा ऐवज लंपास केला याबाबतची चौकशी सुरु आहे. माहीती मिळताच घटनास्थळावर शहर पोलीस निरिक्षक प्रकाश अहिरे यांनी पोलीस पथकासह धाव घेतली. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर डिबी स्काँडसह पोलीस कर्मचारी विविध दिशेने पाठवले. घटनास्थळी डाँग स्काँड बोलावण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीakotअकोट