शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! पबजी, तीन पत्ती खेळताय तर जपून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 19:37 IST

डेबीट, क्रेडीट कार्डची माहिती घेत पॉर्इंटची खरेदी करणारे रॅकेट सक्रीय

ठळक मुद्दे पोलिसांनी हितेश पटेल या महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह नटूभाई ठाकूर (३९) यालाही अटक केली.अहमदाबादच्या दुकलीने आंतराष्ट्रीय गेमसह पबजी, तीन पत्तीचे पॉर्इंट खरेदी केले आणि ते पॉर्इंट पुन्हा गेमवेड्यांना विकून ते लाखो रुपये मिळविल्याचे उघड झाले आहे.

मुंबई - पबजी, तीन पत्ती यांसारख्या आॅनलाईन गेमची सध्या सगळीकडे क्रेझ पहावयास मिळते आहे. मात्र अशा गेमच्या नादात पॉर्इंट कमविण्यासाठी तुम्ही तुमची माहिती शेअर करत असाल, तर जरा जपून. कारण अशा गेमवेड्यांकडून गुगल-फेसबुकच्या माध्यमातून डेबीट/क्रेडीट कार्डची माहिती घेत अहमदाबादच्या दुकलीने आंतराष्ट्रीय गेमसह पबजी, तीन पत्तीचे पॉर्इंट खरेदी केले आणि ते पॉर्इंट पुन्हा गेमवेड्यांना विकून ते लाखो रुपये मिळविल्याचे उघड झाले आहे.मुलुंडमधील तक्रारदार वकील महिलेच्या खात्यातील पैशांतून आंतराष्ट्रीय मुंंगफ्राँग लब, आॅक्ट्रो इंक, तसेच पबजी, तीन पत्तीचे पॉर्इंट खरेदी करण्यात आले. जवळपास २० ते २५ वेळा त्यांच्या खात्यातून व्यवहार झाले. तक्रारदारांनी याप्रकरणी थेट मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.पोलिसांच्या तपासात ते पॉर्इंट अहमदाबादच्या एका व्यक्तीच्या नावाने खरेदी केल्याचे समोर आले. त्यानुसार मुलुंड पोलिसांनी अहमदाबादच्या महादेव नगर परिसरात धाव घेतली. तेथून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत आरोपीचे नाव समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी हितेश पटेल या महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह नटूभाई ठाकूर (३९) यालाही अटक केली.

मुंबईसह राज्यभरातील तरुणांची फसवणूकहितेश पटेल आणि नटूभाई ठाकूर यांच्या चौकशीतून हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यांनी आतापर्यंत मुंबईसह राज्यभरातील विविध लोकांची अशाचप्रकारे फसवणूक केल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे? हे काम कधीपासून सुरू होते? त्यांनी आतापर्यंत किती जणांना फसविले आहे? याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमPoliceपोलिसbankबँकfraudधोकेबाजी