शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल कैदेत आहात? सुटका कशी करणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 06:01 IST

फसवणुकीच्या या प्रकारात चोरटे बहुतांश वेळा पोलिस अधिकारी, सीबीआय किंवा कस्टम अधिकारी असल्याचा बनाव रचतात.

नवी दिल्ली : लोकांना लुबाडण्यासाठी सायबर चोरटे विविध प्रकारांचा अवलंब करीत आहेत. फसवणुकीसाठी नोकरी, बक्षिसे तसेच फॉरेन टूरचे आमिष दाखवले जाते. अश्लील व्हिडीओ पाठवून लोकांना वेठीस धरून मोठी रक्कम उकळली जात असते. पेमेंटसाठी बोगस लिंक पाठवल्या जात असतात. आता डिजिटल हाउस अरेस्ट हा प्रकार उजेडात आला आहे. यात फसलेल्या नागरिकांना लाखो रुपयांचा फटका बसू शकतो. हा धोका वेळीच ओळखून लोकांना सावध राहण्याची गरज आहे.

चोरट्यांच्या जाळ्यात लोक कसे अडकतात?

फसवणुकीच्या या प्रकारात चोरटे बहुतांश वेळा पोलिस अधिकारी, सीबीआय किंवा कस्टम अधिकारी असल्याचा बनाव रचतात. तशा प्रकारचा पेहराव करतात. व्हिडीओ कॉल करताना संबंधित कार्यालय मागे दिसेल अशी व्यवस्था करतात. हेरलेल्या सावजाला फोन केला जातो. खूप मोठ्या आर्थिक व्यवहारात तुमचा पत्ता किंवा आधार कार्ड याचा वापर झाला आहे, असे सांगून तुम्हाला घाबरवले जाते. तुम्ही पाठवलेले पार्सल पकडले गेले आहे. त्यात बेहिशेबी सोने, ड्रग्ज, बंदी घातलेली औषधे आढळली आहेत. त्यामुळे तुमची चौकशी केली जाऊ शकते, अटकही होऊ शकते असे सांगितले जाते. महिलांना अश्लील क्लिप असल्याचे सांगितले जाते. ही व्हायरल झाल्यास मोठी बदनामी होण्याची भीती दाखवली जाते. यातून सुटका करून घेण्यासाठी लोक चोरटे सांगतील त्या ठिकाणी जायला तयार होतात. तिथे गेल्यानंतर लोकांना एकप्रकारे धमकावून अटकेत ठेवले जाते. त्यांच्याकडून हवी तितकी रक्कम उकळली जाते. बँक खात्याचा तपशील आदी बाबी काढून लाखो रुपये उकळले जातात. 

अरेस्ट कशी टाळावी? nकॉल आल्यास अजिबात न घाबरता याची माहिती सायबर पोलिसांना द्यावी. जवळच्या पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवावी. nसरकारने सुरु केलेल्या ‘चक्षु पोर्टल’वर झालेल्या प्रकाराची माहिती लगेच कळवावी. nकुणालाही बँक खाते, पॅन तसेच आधार क्रमांक, कार्ड पिन, ओटीपी या बाबी देऊ नयेत.