शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मला बंदुकीचा परवाना मंजूर करा; स्वसंरक्षणासाठी अनुप डांगेंनी CP कडे केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 22:34 IST

Approve my gun license : काही कामानिमित्त बाहेर गावी गेल्यास ते सोबत नेता येत नाही. बाहेर गेल्यानंतर जीवाला धोका असल्याने बंदूक  वापरण्याची अनुमती देण्याची विनंती डांगे यांनी केली आहे.

ठळक मुद्देपोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी  मंजूर केलेली बंदूक इझिली कॉन्सिलेबल नसल्याने तसेच बाहेरगावी वा राज्यात बाळगण्यास बंधने असल्याने स्वसंरक्षणासाठी तातडीने बंदूक परवाना मंजूर करण्याची विनंती मुंबई पोलीस आयुक्तांना केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या पोलिसाने तातडीने बंदूक ठेवण्यासाठी परवानगी मागितली आहे. परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी  मंजूर केलेली बंदूक इझिली कॉन्सिलेबल नसल्याने तसेच बाहेरगावी वा राज्यात बाळगण्यास बंधने असल्याने स्वसंरक्षणासाठी तातडीने बंदूक परवाना मंजूर करण्याची विनंती मुंबई पोलीस आयुक्तांना केली आहे.

अनुप डांगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधातील खटल्यातील साक्षीदारांना धमकावले जात आहे आणि त्यांच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. अनुप डांगे यांच्या तक्रारीवरुन एसीबीकडून खुली चौकशी सुरू आहे. डांगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. गावदेवी पोलीस ठाण्यात असताना डांगे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून निलंबित करण्यात आल्याचं डांगे यांनी म्हटलं होतं.

अनुप डांगे सध्या पोलीस नियंत्रण कक्षात तैनात आहेत त्यांच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर आहे, मात्र ते पोलीस आयुक्तांच्या सूचनेप्रमाणेच वापरता येऊ शकतं. काही कामानिमित्त बाहेर गावी गेल्यास ते सोबत नेता येत नाही. बाहेर गेल्यानंतर जीवाला धोका असल्याने बंदूक  वापरण्याची अनुमती देण्याची विनंती डांगे यांनी केली आहे.

नेमका काय घडलेला प्रकार ?  

पबवर केलेल्या कारवाईच्या रागात परमबीर यांनी आपले निलंबन केल्याचा आरोप करत, गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी अतिरिक्त गृह सचिवांकड़े तक्रार केल्याचे पत्र व्हायरल झाले आहे. यात, निलंबन न करण्यासाठी ५० लाख तर निलंबनानंतर पुन्हा सेवेत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे २ कोटींची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

डांगे यांनी २ फेब्रुवारी रोजी याबाबतची लेखी तक्रार अपर मुख्य गृहसचिवांकडे केली आहे. त्यात त्यांनी केलेल्या आरोपानुसार, गावदेवी परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या डर्टी बन्स सोबो या पबवर २२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९ रोजी कारवाई केली होती.  या कारवाई दरम्यान पबचा मालक जीतू नावलानी याने तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात असलेल्या परमबीर यांच्यासोबत ‘घरके रिलेशन है’ असे सांगून कारवाईस विरोध केला. पुढे, तेथे धडकलेल्या त्याच्या अन्य दोन मित्रांनी पोलिसांना दमदाटी केली. शिवाय, मारहाणही केली. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही आरोपींना पोलीस ठाण्यात आणताच तेथेही गोंधळ घालत पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पुढे हाच गुन्हा मागे घेण्यासाठी वरिष्ठांचा दबाव वाढला. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये हा घटनाक्रम कैद आहे. अशात यात दुसरा गुन्हा दाखल केला.

Param Bir Singh: "नाेकरीत परत घेण्यासाठी २ काेटी तर कारवाई न करण्यासाठी ५० लाखाची मागणी"; परमबीर सिंगांवर धक्कादायक आरोप

या प्रकारानंतर २५ नोव्हेंबर रोजी एसीबीच्या कार्यालयातून परमबीर सिंग यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा कॉल आला. मात्र याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगताच, तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी भेटीला जाण्यास नकार दिला. त्याबाबत संबंधित एसीबी कार्यालयात कळविण्यात आले. त्यानंतर परमबीर सिंग यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच, माझ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु झाली. पुढे ४ जुलै २०२० रोजी दक्षिण नियंत्रण कक्षात बदली झाली. पाठोपाठ १८ जुलै रोजी माझे निलंबन झाले. याच दरम्यान परमबीर यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगून शार्दुल बायास यांनी बदली थांबविण्यासाठी ५० लाखांची मागणी केली होती. पुढे कामावर परत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे २ कोटींची मागणी केल्याचा आरोप यात केला आहे. तसेच यांचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही नमूद करत यात, त्याने जितेंद्र नवलानी, भरत शाह, राजीव भरत शाह आणि अन्य संबंधितांबाबत मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. परमबीर यांचे त्यांच्यासोबत असलेल्या कनेक्शनची तसेच दाखल गुन्ह्यांबाबतही तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सध्या अनुप डांगे यांना दक्षिण नियंत्रण कक्षात पुन्हा रुजू करण्यात आलं आहे. अनुप डांगे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने डीजी संजय पांडे यांना दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या वतीने परमबीर सिंग यांच्याविषयीचे चौकशीचे हे दुसरे प्रकरण आहे, ज्यामध्ये तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी अँटिलिया स्फोटक प्रकरणात तपासाची दिशाभूल केल्याबद्दल परमबीर सिंग यांच्याविरोधत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

आकसातून परमबीर सिंग यांनी केली कारवाईपरमबीर सिंग यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच, आपली विभागीय चौकशी सुरु झाली. पुढे ४ जुलै २०२० रोजी दक्षिण नियंत्रण कक्षात बदली झाली. पाठोपाठ निलंबन झाले. याच दरम्यान परमबीर यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगून शार्दुल बायास यांनी बदली थांबविण्यासाठी ५० लाखांची मागणी केली होती. पुढे कामावर परत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे २ कोटींची मागणी केल्याचा आरोप निरीक्षक अनुप डांगे यांनी केला आहे. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगMumbaiमुंबईPoliceपोलिसcommissionerआयुक्तCorruptionभ्रष्टाचार