शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शैलेश जगताप, रवींद्र बऱ्हाटे यांच्यासह ७ जणांवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल; तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 13:27 IST

सर्व आरोपींनी कट करुन खोट्या कागदपत्रांच्या आधारे फिर्यादी यांचे समवेत आर्थिक व्यवहार ठरवून व्यवहार पूर्ण न करता, त्यांचे ७२ लाख ३० हजार परत न करता फसवणूक केली.

पुणे : खोट्या कागदपत्राच्या आधारे शिवाजीनगर येथील जागा खरेदी करुन देतो, असे सांगून ७२ लाख ३० हजार रुपये घेऊन व्यवहार पूर्ण न करता फसवणूक केली व पैसे परत मागितल्यावर त्यांच्या कानाला रिव्हॉल्व्हर लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले असून समर्थ पोलिसांनी बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश जगताप, माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्यात बडतर्फ पोलीस शिपाई परवेज शब्बीर जमादार (वय ३५, रा़ सोमवार पेठ पोलीस लाईन), जयेश जितेंद्र जगताप (वय ३०, रा़ घोरपडे पेठ), अमित विनायक करपे (वय ३३, रा़ रास्ता पेठ) यांना आज पहाटे ५  वाजता अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ऋषिकेश अशोक बारटक्के (वय ३५, रा़ मायोला, रेसिडेन्सी, ऋतुजा पार्क) यांनी समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१८ च्या दरम्यान आरोपींनी फिर्यादी यांना सेनापती बापट रोडवरील शिवाजीनगर हौसिंग सोसायटी, येथील बंगला व आऊट हाऊस ही मिळकत प्रकाश फाले यांच्या मालकीची असून त्यांचा जयेश जगताप यांच्या समवेत करारनामा झाला असल्याचे भासवून त्याची प्रत दाखवली़ या जागेबाबत प्रकाश फाले यांचा न्यायालयीन दाव्यावर युक्तीवाद झाला असून न्यायालयीन निकाल ३ महिन्यात निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे, असा भरवसा शैलेश जगताप व इतरांनी दिला़ या जमिनीचा व्यवहार करण्यासाठी फिर्यादीस प्रवृत्त केले.

या जागेवरील आरोपींचा हक्क सोडण्यासाठी २ कोटी आणि प्रकाश फाले जमीन मालक म्हणून त्यांना अडीच कोटी रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले़ त्यानुसार प्रकाश फाले यांना ४९ लाख ३० हजार रुपये दिले होते़ तसेच शैलेश जगताप यांच्या सांगण्यावरुन अमित करपे यांच्या बँक खात्यावर ११ लाख ५० हजार रुपये ट्रान्सफर केले़ शैलेश यांनी फोर्ड एन्डेव्हर गाडीची मागणी केली़ त्याचे मागणीनुसार समर्थ पोलीस ठाण्याच्या समोरील जागेवरील कार्यालयात रोख स्वरुपात ११ लाख रुपये फिर्यादीने दिले़ तीन महिन्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये फिर्यादी यांनी शैलेश जगताप यांच्या कार्यालयात जाऊन विचारणा केली़ तेथे रवींद्र बºहाटे, जयेश जगताप, शैलेश जगताप, परवेज जमादार हे बसलेले होते़ त्यावेळी व्यवहार आता लांबत चालला असून आपल्याला व्यवहार करायचा नाही, असे सांगितल्यावर शैलेश जगताप यांनी फिर्यादी यांच्या कानाखाली मारली़ इतरांनी मारहाण केली़ शैलेश जगताप यांनी रिव्हॉव्हर काढून कानशिलाला लावली व राहिलेले १ कोटी ८८ लाख रुपये द्यायचे नाही तर तुला जिवंत सोडणार नाही़ मी गनमॅन म्हणून प्रसिद्ध आहे़ तुला माहित नाही का, आम्ही लोकांची वसुल करतो, तू आमच्याकडून वसुली करणार का? अशी धमकी ही दिली़ त्यानंतर परवेज जमादार याने फिर्यादीस फोनकरुन तुझ्या नावावर अ‍ॅक्सेस गाडी घेऊन मला पाठव असा दम दिला़ त्यावरुन फिर्यादीने त्यांचा मित्र कमलेश भाटी याच्या नावावर गाडी घेऊन ती परवेज जमादार यांना दिली.

सर्व आरोपींनी कट करुन खोट्या कागदपत्रांच्या आधारे फिर्यादी यांचे समवेत आर्थिक व्यवहार ठरवून व्यवहार पूर्ण न करता, त्यांचे ७२ लाख ३० हजार परत न करता फसवणूक केली. यामुळेच केले होते बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश जगताप आणि पोलीस शिपाई परवेज जमादार यांना नीलमणी देसाई यांच्या तक्रारीवरुन पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते़ या चौकशीत पोलिसांनी ऋषीकेश बारटक्के या गुन्हेगाराशी संबंध ठेवले. त्याच्याकडून कपडे खरेदी केल. व इतर अनेक आरोप ठेवून त्यांना बडतर्फ केले होते. आता बारटक्के यांच्या फिर्यादीवरुन खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसExtortionखंडणी