शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांच्यासह इतरांवर फसवणुकीचा आणखी दोन गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 19:09 IST

हडपसरमध्ये ११ जणांवर तर, खडक पोलीस ठाण्यात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे : जमिनीची अगोदरच विक्री झाली असताना तिच्या व्यवहारापोटी २० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा बडतर्फ पोलीस हवालदार शैलेश जगताप यांच्यासह तिघांवर खडक पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.शैलेश जगताप यांच्यावर आतापर्यंत कोथरुड, समर्थ आणि आता खडक आणि हडपसर अशा ४ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. शैलेश जगताप, प्रकाश फाले (रा़ सांगवी) आणि मिना कंजारी (रा़ पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सत्यभामा पोपट चांदगुडे (वय ४०, रा. चिखली) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ ही घटना नोव्हेंबर २०१५ मध्ये मामलेदार कचेरीमध्ये घडली होती. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शैलेश जगताप, देवेंद्र जैन, रवींद्र बऱ्हाटे यांच्यावर कोथरुड, समर्थ पोलीस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ सध्या समर्थ पोलिसांनी जैन, जगताप यांच्यासह ५ जणांना अटक केली आहे. मिना कंजारी यांनी आपली उंड्री येथील जागा २०१२ मध्ये विकली होती. तरीही त्यांनी दोन गुंठा जागा विकायची असल्याचे सांगितले. त्यासाठी शैलेश जगताप व प्रकाश फाले यांच्या मध्यस्थीने व्यवहार करण्यात आला. तसेच औंध येथील जमिनीच्या व्यवहारपोटी सत्यभामा चांदगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून आरोपींनी २० लाख रुपये घेतले. त्यापैकी १ लाख रुपयांची इसार पावती मामलेदार कचेरीमध्ये करण्यात आली होती. परंतु, चांदगुडे यांना ही जागा अगोदरच विकण्यात आली असल्याचे समजल्यावर त्यांनी पैसे परत मागितले. तेव्हा शैलेश जगताप यांनी पैसे परत मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घाबरुन आपण गप्प बसल्याचे चांदगुडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे अधिक तपास करीत आहेत.दरम्यान, हडपसर पोलीस ठाण्यात प्रकाश फाले, त्याची पत्नी सविता फाले, शैलेश जगताप, त्याचा पुतण्या जयेश जगताप, परवेश जमादार, यश फाले, अ‍ॅड़ विजय काळे, माहिती अधिकार कार्यकर्ते रवी बऱ्हाटे , पत्रकार देवेंद्र जैन, विनय मुंदडा, मुकेश पौडवाल यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी कैलास शिवाजी शिरसाठ (वय ३०, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना २०१७ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान घडली. प्रकाश फाले व इतरांनी कोथरुड, औंध, सेनापती बापट रस्त्यावरील जागा खरेदीत पैसे गुंतवल्यास दामदुप्पट नफा मिळेल, असे आमिष दाखवून शिरसाठी यांच्याकडून १० लाख व त्यांचे मेहुणे विलास नेवगे यांच्याकडून २० लाख रुपये असे ३० लाख रुपये घेतले. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर पैसे परत मागितल्यावर जगताप यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखविला. अ‍ॅड. विजय काळे यांनी त्यांच्याशी संगनमत करुन तुमचे पैसे बुडणार नाही, अशी हमी देऊन दिशाभूल करुन फसवणूक केली़. सहायक पोलीस निरीक्षक भाबड अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस