शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्न लावून अर्थिक फसवणुकीचा राधानगरी तालुक्यात आणखी एक गुन्हा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 22:48 IST

प्रवीण राजाराम बोरनाक यांनी ही फिर्याद दिली आहे. 

राधानगरी- राधानगरी तालुक्यातील धामोड येथील दोघांची अगोदर लग्न झालेल्या मुलींशी लग्ने  लावून पाच लाख सत्तर हजाराची   फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी वधू सह  नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे म्हासुर्ली पैकी जोगमवाडी  इथली घटना ताजी असतानाच हा प्रकार उघड झाल्याने राधानगरी तालुक्यात खळबळ उडाली आहे.  प्रवीण राजाराम बोरनाक यांनी ही फिर्याद दिली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण बोरनाक आणि श्रीकांत ज्ञानदेव जाधव यांनी लग्ने जुळवण्यासाठी मध्यस्थांची मदत घेतली. छाया प्रकाश दामुगडे रा. घानवडे ता.करवीर,संध्या विजय स्वप्रेकर रा. सांगली, पांडुरंग कदम रा. चिकोडी जि.बेळगाव, प्रियंका राजू जाधव रा.मुंबई,  चेतन प्रल्हाद गायकवाड रा.सोलापूर, पंकज श्रावण भालेराव रा.सोलापूर, मेघा राजाराम मुळेद रा. सांगली,या मध्यस्थानी प्रवीण याचे पूनम कुमार जीवने रा.चिकोडी जि. बेळगाव हिच्याशी व श्रीकांत याचे अश्विनी श्रावण भालेराव रा.सोलापूर यांच्याशी  लग्न जुळवून दिले. नोव्हेंबर महिन्यात ही लग्ने धामोड येथे पार पडली. 

या दोन्ही मुलींची अगोदर लग्ने झाली असतानाही  माहिती लपवून विवाह लावून दिला.यासाठी प्रवीण यांच्याकडून  रोख रक्कम आणि सोन्याचांदीच्या दागिन्यासह  तीन लाख नव्वद हजार रुपये . व श्रीकांत याच्याकडून रोख व सोने असे एक लाख ऐंशी  हजार  रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने प्रवीण बोरनाक यांनी आज वरील  नऊ जणांवर राधानगरी पोलिसात तक्रार दिली आहे.  पोलीस उपनिरीक्षक व्ही एन घाडगे,बजरंग पाटील तपास करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी