शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Ankita Murder Case: रिसॉर्टमध्ये ग्राहकांसोबत शरीर संबंध ठेवण्यास अंकिताने नकार दिला; आरोपींनी धक्कादायक खुलासा केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 20:14 IST

घटनेच्या दिवशी माजी मंत्र्याचा मुलगा आणि त्याचे दोन मॅनेजर मित्र दोन वेगवेगळ्या गाड्यांमधून अंकितासोबत निघाले. त्यांनी फास्टफूड आणि दारु पार्टी केली.

अंकिता मर्डर केसमध्ये आज मोठमोठे खुलासे झाले आहेत. उत्तराखंडच्या भाजपाच्या नेत्याचे हे रिसॉर्ट असून त्याचा मुलगाच या मर्डरमागील मुख्य आरोपी आहे. त्याला आणि त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी जनतेचा दबाव आल्यावर अटक केली असून त्यांच्या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे. 

या रिसॉर्टमध्ये अशीच एक तरुणी यापूर्वी बेपत्ता झाली होती. या रिसॉर्टमध्ये गैरधंदे सुरु असायचे. काही महिन्यांपूर्वीच रिसेप्शनिस्ट म्हणून लागलेल्या अंकितावर देखील असाच एक प्रसंग ओढवला होता. यामुळे तिची नाल्यात ढकलून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

गुरुवार, शुक्रवारी सायंकाळपर्यंत अंकिताचा मृतदेह सापडला नव्हता. शनिवारी सकाळी तिचा मृतदेह सापडला. माजी राज्यमंत्र्याचा मुलगा पुलकित आर्यने तिला धक्का देऊन वाहत्या नाल्यात अंकिताला ढकलले होते. यानंतर ते पसार झाले होते. ती जिवंत असल्याचे ते कर्मचाऱ्यांना भासवत होते. पोलिसांच्या चौकशीत अंकिता १८ ऑक्टोबरला पुलकित आर्य, मॅनेजर अंकित आणि भास्कर यांच्यासोबत रिसॉर्टमधून बाहेर गेल्याचे समोर आले. रात्रीचे आठवाजले होते. यानंतर साडे दहा वाजता हे तिघे रिसॉर्टला आले, परंतू अंकिता नव्हती. 

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींची चौकशी केली, तेव्हा त्यांनी घटनाक्रम सांगितला. अंकिताला त्यांनी रिसॉर्टमध्ये येणाऱ्या ग्राहकांसोबत शरीर संबंध म्हणजेच वेश्याव्यवसाय करण्यास वारंवार सांगितले होते. परंतू तिने नकार दिला होता. तसेच ही गोष्ट ती सर्वांना सांगत होती, यामुळे तिला संपविल्याचे या आरोपींनी सांगितले. ती यानंतर रिसॉर्टमधील काळ्या धंद्यांची माहिती लोकांना देईल अशी धमकी देत होती. यावरून वाद सुरु होता. घटनेच्या दिवशी माजी मंत्र्याचा मुलगा आणि त्याचे दोन मॅनेजर मित्र दोन वेगवेगळ्या गाड्यांमधून अंकितासोबत निघाले. त्यांनी फास्टफूड आणि दारु पिली. यानंतर नाल्याजवळ गेले. इथे अंकिता आणि पुलकितमध्ये भांडण सुरु झाले. यामुळे रागातून अंकिताने पुलकितचा मोबाईल हिसकावला व नाल्यात फेकून दिला. 

याचा पुलकितला राग आला, त्याने तिला नाल्यात ढकलून दिले. अंकिताने दोनदा पाण्यातून वर येत मदतीसाठी हाका मारल्या, परंतू तिघे घाबरून पळाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttarakhandउत्तराखंड