शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता भंडारी हत्या प्रकरणात नवा खुलासा; "भाजपा आमदाराच्या सांगण्यावरूनच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 09:19 IST

जर अंकिताच्या हत्येनंतर रिसोर्टवर घटनास्थळ संरक्षित केले गेले असते तर अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले असते.

नवी दिल्ली - Ankita Bhandari Murder Case ( Marathi News ) उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरणी सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत साक्षीदार आणि बुलडोझर चालक दीपकनं कोर्टात त्याचा जबाब नोंदवला आहे. तत्कालीन उपजिल्हाधिकारी आणि भाजपा आमदाराच्या सांगण्यावरूनच हत्याकांडातील आरोपी पुलकित आर्याच्या वनंत्रा रिसोर्टवर जेसीबी चालवला होता असं त्याने कोर्टात सांगितले.  ऋषिकेशच्या श्यामपूर इथं राहणाऱ्या दीपकनं शुक्रवारी कोर्टात जबाब दिला. त्यात दीपक म्हणाला की, मी तत्कालीन उपजिल्हाधिकारी आणि सध्या विद्यमान आमदार रेनू बिष्ट यांच्या सांगण्यावरून जेसीबीनं रिसोर्टचे गेट, भिंती आणि खिडक्या आणि खोल्या तोडल्या. सत्येंद्र सिंह रावत यांचा जेसीबी मी चालवत होतो. त्यांनी सांगितल्यानंतर मी २३ सप्टेंबर २०२२ रोजी जेसीबी घेऊन वनंत्रा रिसोर्टवर पोहचलो.अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार मी रिसोर्टचा गेट आणि सुरक्षा भिंत तोडून तिथून हरिद्वारसाठी रवाना झालो. पण तिथं आमदार रेनू बिष्ट यांच्या खासगी सहाय्यकाने फोन करून पुन्हा जेसीबी घेऊन रिसोर्टवर पोहचण्यास सांगितले. 

तो जेसीबी घेऊन पुन्हा रिसोर्टवर पोहचला तिथे आमदारही होते. त्यांनी सांगितल्यानंतर मी २ खोल्या आणि खिडक्या तोडल्या. या कामानंतर त्या रात्री मला आमदाराने त्याच रिसोर्टवर मुक्काम करायला सांगितला. दीपकशिवाय अन्य २ साक्षीदार पोलिसांनी या प्रकरणी कोर्टासमोर हजर केले. त्यात २ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. या प्रकरणाच्या सुरुवातीपासून स्थानिक भाजपा आमदार पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करतायेत असा आरोप होत होता. मात्र सातत्याने आमदाराकडून त्यास नकार दिला जात होता. जर अंकिताच्या हत्येनंतर रिसोर्टवर घटनास्थळ संरक्षित केले गेले असते तर अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले असते. आता जेसीबी चालकाच्या साक्षीनंतर रिसोर्टवर आमदारांच्या सांगण्यावरून जेसीबी चालवण्यात आला हे स्पष्ट झाले आहे.

काय आहे प्रकरण?१९ वर्षीय अंकिता भंडारी ऋषिकेशच्या पौडी जिल्ह्यातील वनंत्रा रिसोर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कथितपणे रिसोर्ट संचालक पुलकित आर्याने त्याच्या २ सहकाऱ्यासोबत मिळून तिला नाल्यात ढकलून अंकिताची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली. पुलकितचे वडील विनोद आर्य हे भाजपात होते. परंतु या घटनेनंतर भाजपाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी