शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

अनिल जयसिंघानीची कोट्यवधींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 10:34 IST

यापूर्वी ६ जून रोजी जयसिंघानी याचे शिर्डी येथील हॉटेलदेखील ईडीने जप्त केले होते.

मुंबई : २०१५ साली आयपीएल सामन्यां दरम्यान झालेल्या २,६०० कोटी रुपयांच्या सट्टेबाजी प्रकरणात उजेडात आलेला कथित बुकी अनिल जयसिंघानी याची ३ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यापूर्वी ६ जून रोजी जयसिंघानी याचे शिर्डी येथील हॉटेलदेखील ईडीने जप्त केले होते.

शिर्डी येथील हॉटेलचा भूखंड जयसिंघानी याने २ कोटी रुपयांना विकत घेतला होता आणि तो व्यवहार सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांतून केल्याचा ठपका ईडीने ठेवला असून, सट्टेबाजीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल म्हणून हे हॉटेल जप्त करण्यात आले आहे. मार्च महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. 

जयसिंघानीची मालमत्ता १०० कोटींची असल्याचे ईडीच्या प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. यामध्ये हॉटेल्स, फ्लॅटस, दुकाने, भूखंड आणि अन्य स्थावर मालमत्तांचा समावेश असल्याचे समजते. जयसिंघानीच्या कुटुंबीयांच्या, तसेच निकटवर्तीयांच्या बँक खात्यांतही बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांना दिसून आले आहे. 

आरोपपत्र दाखल२०१५ साली झालेल्या आयपीएल सामन्यांदरम्यान झालेल्या बेटिंग प्रकरणात अनेक बुकी सक्रिय होते. त्यांच्याविरोधात त्यावेळी बडोदा येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर याच तक्रारीच्या आधारे ईडीनेदेखील तपास सुरू केला होता. याप्रकरणी ईडीने अहमदाबाद येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी जससिंघानीला अनेक वेळा समन्स जारी करण्यात आले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी