शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! संतापलेल्या जावयाने सासूला एवढं मारलं की तिचं नाक तुटलं अन्...; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 15:16 IST

किरण देवी, आदित्य कुमार आणि पायल देवी अशी जखमींची नावे आहेत.

बिहारच्या बेगुसरायमध्ये जावयाने आपल्या साथीदारांसह आपच सासू, मेव्हणी आणि मेव्हण्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसराच एकच खळबळ उडाली आहे. लोहिया नगर सहायक पोलीस स्टेशन हद्दीतील वॉर्ड क्रमांक 11 मधील ही घटना आहे. या घटनेत जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरण देवी, आदित्य कुमार आणि पायल देवी अशी जखमींची नावे आहेत.

जखमी किरण देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा जावई आणि काही लोक अचानक घरात घुसले आणि शिवीगाळ व मारहाणीची घटना घडली. मुलीवर सतत अत्याचार होत होते, याला तिच्या मुलीने विरोध केला, म्हणून त्या लोकांनी ही घटना घडवली. लग्न झाल्यापासून जावई व सासरच्या मंडळीकडून मुलीचा सतत छळ होत असल्याचं जखमींनी सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत जावयाने केलेल्या मारहाणीमुळे सासूचं नाक तुटलं आहे. जावई काही ना काही मागणी करत राहतो, जे देण्यास असमर्थ असल्याचे जखमींनी सांगितले. यानंतर ही भयंकर घटना घडली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या लहान मुलीचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. ही घटना जावयानेच घडवून आणल्याचा आरोप होत आहे.  एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार