शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

“न मैं जिंदा रहूंगा न तू बचेगी”; संतापलेल्या युवकानं घरात घुसून प्रेयसीवर गोळी झाडली अन् आत्महत्या केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 19:39 IST

पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहे. प्रेम संबंधातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या आधीपासून या दोघांमध्ये मैत्री होती. युवक युवती एकाच कंपनीत काम करत होतेयुवकाने थेट घरात घुसून युवतीवर गोळी झाडली. त्यानंतर स्वत:ला गोळी मारली. दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली आणि जवळीक वाढली. हे दोघंही एकमेकांसोबत लग्न करू इच्छित होते

इंदूर – मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका हत्येने परिसरात दहशत पसरली आहे. माथेफिरू युवकानं घरात घुसून युवतीला गोळी मारली आहे. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या दोघांना जखमी अवस्थेत नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेत मुलीची अवस्था गंभीर आहे तर माथेफिरू युवकाचा मृत्यू झाला आहे.

पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहे. प्रेम संबंधातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लॉकडाऊनच्या आधीपासून या दोघांमध्ये मैत्री होती. युवक युवती एकाच कंपनीत काम करत होते. युवकाने थेट घरात घुसून युवतीवर गोळी झाडली. त्यानंतर स्वत:ला गोळी मारली. या घटनेत युवकाचा मृत्यू झाला आणि युवती गंभीररित्या जखमी झाली आहे. गोळी मारण्यापूर्वी युवकानं युवतीला सांगितलं की, ना मी जिवंत राहणार ना तु आता वाचणार असं म्हणत त्याने गोळी मारली.

पोलिसांच्या माहितीनुसार, या मुलीचं लग्न दुसऱ्याठिकाणी निश्चित झालं होतं. साखरपुडाही ठरवण्यात आला होता. त्यामुळे युवक खूप त्रस्त होता. शनिवारी रात्री युवकाने थेट मुलीच्या घरात प्रवेश केला. रागाच्या भरात युवकाने युवतीवर बंदुकीतून गोळी झाडली. गोळी मुलीच्या कानाला टच होऊन निघून गेली. त्यानंतर युवकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या स्थितीत दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात युवकाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले तर युवतीवर सध्या उपचार सुरू आहेत. ती लवकर बरी होईल असं डॉक्टर म्हणाले.

युवक-युवती एकाच कंपनीत करत होते काम

या घटनेनंतर पोलीस प्रेम संबंधाचाही तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपी मुलाच्या घरच्यांची चौकशी सुरू केली आहे. दोघंही एकाच कंपनीत जॉब करत होते. त्यावेळी दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली आणि जवळीक वाढली. हे दोघंही एकमेकांसोबत लग्न करू इच्छित होते. युवकाने युवतीला अंगठीही दिली होती. परंतु मुलीच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या युवकासोबत ठरवलं. घरच्यांना विरोध न करता युवतीही लग्नासाठी तयार झाली. ही बाब युवकाला समजताच त्याला सहन झालं नाही आणि त्याने मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडे बंदूक कुठून आली याचा तपासही पोलीस करत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसFiringगोळीबार