शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अंधेरी कामगार रुग्णालय आग प्रकरण : मुख्य अभियंत्यासह त्याच्या सहाय्यकास अटक 

By पूनम अपराज | Updated: December 19, 2018 20:13 IST

सुप्रीम कन्स्ट्रक्शनच्या मुख्य अभियंत्यासह त्याच्या सहाय्यकास एमआयडीसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. 

ठळक मुद्देमारत बांधत असलेल्या सुप्रीम कन्स्ट्रक्शनचा मुख्य अभियंता निलेश मेहता आणि त्याचा सहाय्यक नितीन कांबळेला पोलिसांनी अटक केली . एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०४ - अ अन्वये गुन्हा या दोघांविरोधात दाखल केलाआगीत नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर जवळपास १४० जण जखमी झाले होते.

मुंबई - अंधेरी येथील कामगार रुग्णालय आग प्रकरणी इमारत बांधणाऱ्या सुप्रीम कन्स्ट्रक्शनच्या मुख्य अभियंत्यासह त्याच्या सहाय्यकास एमआयडीसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. 

अंधेरी एमआयडीसी परिसरातील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर जवळपास १४० जण जखमी झाले होते. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास कामगार रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली होती. कामगार रुग्णालयाची इमारत बांधत असलेल्या सुप्रीम कन्स्ट्रक्शनचा मुख्य अभियंता निलेश मेहता आणि त्याचा सहाय्यक नितीन कांबळेला पोलिसांनी अटक केली असून अद्याप रुग्णालयाचे काही बांधकाम देखील शिल्लक असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी लोकमतशी बोलताना दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०४ - अ अन्वये गुन्हा या दोघांविरोधात दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. 

 

टॅग्स :Andheri Hospital Fireअंधेरी कामगार रुग्णालयाला आगArrestअटकPoliceपोलिस