शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आईनं घेतली ५००० उधारी, मुलीला किंमत चुकवावी लागली; ३ महिन्यांची गर्भवती राहताच..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 17:57 IST

हा प्रकार कुरुद परिसरातील असून घटना उघड होताच पीडित मुलीच्या आईनं धमतरी पोलीस ठाण्यात २७ जानेवारीला तक्रार दाखल केली.

धमतरी - छत्तीसगडच्या धमतरी इथं बलात्काराच्या घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे. जिल्ह्यातील एका महिलेने शेजारील वृद्ध व्यक्तीकडून ५ हजार रुपये उधारी घेतली होती. ज्याची किंमत मुलीला तिची इज्जत देऊन चुकवावी लागली. या उधारीचा गैरफायदा घेत आरोपीनं अल्पवयीन मुलीचं खूप काळ लैंगिक शोषण केले. जेव्हा ही मुलगी ३ महिन्याची गर्भवती राहिली तेव्हा या प्रकाराचा खुलासा झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. 

हा प्रकार कुरुद परिसरातील असून घटना उघड होताच पीडित मुलीच्या आईनं धमतरी पोलीस ठाण्यात २७ जानेवारीला तक्रार दाखल केली. हे उधारीचं प्रकरण २०२२ च्या ऑक्टोबरमधील आहे. अल्पवयीन मुलीच्या आईनं सांगितले की, घरात पैशाची चणचण होती त्यासाठी शेजारील वृद्ध सुदर्शन नागरची यांच्याकडून आर्थिक मदत म्हणून ५ हजार रुपये घेतले होते. ज्यादिवशी उधारी मागितली त्याच दिवशी अल्पवयीन मुलीला घरी बोलावलं आणि तिच्यासोबत बळजबरी केली. आरोपीनं पीडिता आणि महिलेला याविषयी कुठे वाच्यता केली तर जीवे मारेन अशी धमकी दिली. यानंतर आरोपी सातत्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत राहिला. 

हा प्रकार सुरू असताना काही दिवसांपासून अल्पवयीन मुलीच्या तब्येतील बिघाड झाला. जेव्हा मुलीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले तेव्हा मुलगी ३ महिन्याची गर्भवती असल्याचं उघड झाले. हे प्रकरण समोर येताच पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी ६० वर्षीय सुदर्शनला त्याच्या राहत्या घरातून २९ जानेवारीला अटक केली. आरोपीनं त्याचा गुन्हा कबूल केला असून पॉक्सो अंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी २९४, ३२३, ५०६, ३७६(२) कलमातंर्गत कारवाईही केली आहे.