शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 3 मुलांसह 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

तिकीट प्रवासाची तारीख बदलणे पडले १० लाखांना; पवईत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

By गौरी टेंबकर | Updated: March 3, 2023 12:42 IST

हा फोन छापरा यांनी १५ मिनिटे चालू ठेवत समोरून काहीच प्रतिसाद नसल्याने नंतर कट केला.

मुंबई - विदेशात जाण्यासाठीच्या विमानाची तारीख बदलणे पवईतील एका वृद्धाला महागात पडले आहे. या त्यांच्या खात्यातून दहा लाखाहून अधिक रक्कम काढण्यात आल्यावर त्यांनी पवई पोलिसांकडे धाव घेतली आहे.तक्रारदार हरवंद सिंग छापरा (७८) हे त्यांच्या पत्नीसह पवईत राहतात. त्यांना २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ९८८३९००८५२ या क्रमांकावरून फोन आला. ज्याने स्वतःचे नाव राहुल असे सांगत तो टर्किश एअरलाइन चा एजंट असल्याची ओळख दिली. त्यानंतर त्याने छापरा यांना तुम्ही जी मुंबईहून युएसएला जाण्याची तिकीट बुक केली आहे त्याबाबत आपल्याला काही तक्रार आहे का अशी विचारणा केली. त्यावर छापरा यांनी हो म्हणत प्रवासाची तारीख बदलायची असल्याचे सांगितले.

ते ऐकल्यावर कॉलर ने त्यांना तारीख बदलायची असल्यास त्याची फी भरावी लागेल असे सांगत छापरा यांचा बँक अकाउंट नंबर आणि डेबिट कार्ड क्रमांक घेतला. त्यांना ५ हजार रुपये भरायला सांगत एअरलाइन्सचा मेसेज येईपर्यंत फोन चालू ठेवण्यास सांगितला. हा फोन छापरा यांनी १५ मिनिटे चालू ठेवत समोरून काहीच प्रतिसाद नसल्याने नंतर कट केला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून एकूण १० लाख १५ हजार रुपये डेबिट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सदर इसम त्यांना सतत फोन करत होता मात्र त्यांनी तो उचलला नाही. आणि त्यांच्या बँकेत जाऊन खाते फ्रीज करून पोलीस ठाण्यात तक्रार केली.